Janhvi kapoor Health Update जान्हवीची प्रकृती खालावली, बोनी कपूर यांनी दिली महत्वाची माहीती
Janhvi Kapoor Health: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रकृती खालवण्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जान्हवीला अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे. आता जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी आपल्या मुलीच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

ETimes शी बोलताना बोनी कपूर म्हणाले की, जान्हवी कपूर पुढील 1-2 दिवस रुग्णालयमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. सध्या तिच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
याआधी जान्हवी कपूर अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये दिसली होती. या जान्हवीने तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत लग्नात हजेरी लावली होती . जान्हवी कपूरचे लग्नातील फोटो व्हायरल झाले होते, ज्यावर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. जान्हवी कपूर आणि राधिका मर्चंटही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. राधिका-अनंतच्या लग्नातही या अभिनेत्रीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. जान्हवीचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच फंक्शनमध्ये जान्हवीने तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. जान्हवीचे अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
काल म्हणजेच 18 जुलै रोजी जान्हवी कपूरची तब्येत खूपच खालावली होती, त्यानंतर तिला घाईघाईने दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जान्हवीची तब्येत बिघडल्याची बातमी ऐकून चाहते खूपच नाराज झाले होते. जान्हवी लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करू लागले आहेत.












Click it and Unblock the Notifications