Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आरारा खतरनाक! Google Trends ला चर्चेत आला 'हा' जबरा डान्स; Video पाहिला तर 'तौबा तौबा' विसराल

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ वरील 'पाताल लोक' वेब सीरीज तुम्हाला माहितीए ना? हो, तीच ज्यात जयदीप अहलावतने हाथीराम चौधरी नावाच्या पोलिसाची भूमिका साकारलीय. या वेब सिरीजला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता हाच अभिनेता जयदीप अहलावत अचानक गुगलवर ट्रेंड करू लागलाय. त्याचं कारण आहे, त्याचा सैफ अली खानसोबतच्या 'ज्वेल थीफ' चित्रपटातलं 'जादू' हे गाणं... सध्या जयदीपच्या याच गाण्यानं धुमाकूळ घातलाय. या गाण्यात तो असा काही नाचलाय की, त्यानं विकी कौशलच्या तोबा-तोबा गाण्यालाही मागं टाकलंय...

Jaideep Ahlawat trending video

'जादू'ची सोशल मीडियावर जादू

जयदीपचा ज्वेल थीफ हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्या चित्रपटाचील जादू हे गाणे रिलीज करण्यात आले. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड करत आहे. या गाण्यात जयदीपने सैफ अली खानसोबत केलेल्या डान्सचे सध्या जोरदार कौतूक होत आहे. काही जणांनी तर हे गाणे पाहून जयदीप हा विकी कौशलपेक्षाही भारी डान्स करतो, असं म्हटलं आहे.

जयदीप करतोय ट्रेंड

जयदीप अहलावत सध्या गुगल ट्रेंड करतोय. त्याचे कारण आहे जादू गाण्यावर त्याने केलेला शानदार डान्स. या डान्स स्टेप्सचा व्हिडीओ टक्करिंग सिनेमॅनिटी ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम चॅनलवर अपलोड केले आहे. जयदीप अहलावतच्या 'जादू' गाण्यातील डान्सची तुलना 'छावा'चा एक्टर विक्की कौशलच्या तौबा -तौबाशी करण्यात येऊ लागली आहे. या गाण्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विक्वी को भूल जाओगे... गाण्यांमध्ये सैफ अली खान, जयदीप अहलावत आणि निकिता दत्ता ही आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+