Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jaat movie dialogue 'जाट'च्या 'या' 5 फेमस डायलॉग्सनी माजवली खळबळ; सलमाननेही शेअर केला VIDEO

Jaat movie dialogue : गदर, इंडियनसारखी ब्लाॅक बस्टर अन् बाॅक्स ऑफीसवर गल्ला जमवणारे धमाकेदार चित्रपटात भूमिका साकारणारा 'ढाई किलो का हात'अर्थात सनी देओलच्या आगामी जाट चित्रपटातील डाॅयलाॅग्जने खळबळ माजवली आहे. बाॅक्स ऑफीसवर धमाका करणाऱ्या या चित्रपटाची आता चर्चा देशात होत आहे.

बॉलिवूड ॲक्शन स्टार सनी देओल आपल्या वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळ्या भुमिकांमुळे सिनेरसिकांच्या मनात ठसलेला आहे. त्याच्या 'जाट' या नव्या चित्रपटामुळे तो आता चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. सनी देओलच्या 'जाट'मधील दमदार ॲक्शन सीन्स आणि दमदार संवाद प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

Jaat movie dialogue

सनीचे डाॅयलाग्ज लोकांच्या तोंडावर

सनी देओलचे अनेक डायलाॅग प्रसिद्ध आहेत, ते लोकांच्या मनात ठसले आहेत. ढाई किलो का हात आणि तारीख पे तारीख या जुन्या डाॅयलाॅगची आठवण आता रसिकांना येत आहे. कारण जाट चित्रपटात 'जब उठेंगे ये हाथ, सारा भारत गुंज उठेगा' ते 'जब मैं मारना शुरू करता हूं, तब मैं गिनता नहीं हूं।' आदी 5 डायलॉग्स खूप व्हायरल होत आहेत.

Take a Poll

जाणून घेऊया जाट सिनेमातील 5 फेमस डायलाॅग्ज

1. 'ये हाथ जब उठेगा ना तो पूरा इंडिया गूंज उठेगा' हा डायलाॅग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, लोकांच्या ओठांवर हा डायलाॅग आहे.

2.'मैं जाट हूं, सर कटने के बाद भी हाथ हथियार नहीं छोड़ते।' चित्रपटात असा एक डायलॉग आहे, तो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आणि हा डायलॉग जुन्या सनी देओलची आठवण करुन देतो.

3. 'रनतूंगा के इलाके में रास्ता किलोमीटर में नहीं, बिछी हुई लाशों में नापा जाता है।'जाट चित्रपटातील हा सर्वात खतरनाक डायलॉग आहे. चित्रपटातील हा डायलॉग ऐकून रोमांच उभा राहतो.

4.'जान की कीमत जान कर भी जान को जोखिम में डालने वाला।' सनी देओलच्या जाट चित्रपटातील हा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5. 'जब मैं मारना शुरू करता हूं, तब मैं गिनता नहीं हूं।' जाट चित्रपटातील हा सर्वात स्फोटक संवाद असून यातून चित्रपटातील ॲक्शन दृश्यांची झलक पाहायला मिळते.

भाईजानने शेअर केला

जेव्हाही कोणत्याही स्टारचा चित्रपट रिलीज होतो तेव्हा सलमान खान अनेकदा त्याला सपोर्ट करताना दिसतो. प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा चित्रपट 'जाट' काल 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अभिनेता सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सनीच्या या चित्रपटाचे कौतूक केले आणि सपोर्ट केला. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिनेत्याच्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. यानंतर नेटिझन्स भाईजानचे खूप कौतुक करत आहेत.

अभिनेता सनी देओलचे चित्रपट कशासाठी जास्त प्रसिद्धझोतात येतात?

अभिनेता सनी देओलचे चित्रपट त्याच्या संवादामुळे (डायलाॅग्ज) जास्त प्रसिद्ध होतात.

सनी देओल कुणाचा मुलगा आहे?

सनी देओल अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. 

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+