Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हार्दिक पांड्या आणि नताशाला मिळाले नवीन जोडीदार, आता मुलगा अगस्त्याचं काय होणार?

Hardik Pandya-Natasha Son Agastya: टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पूर्वीची पत्नी नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांसोबत नव-नवीन अपडेट्स शेअर करत राहतात.

हार्दिक पांड्या आणि नताशाचे तुटले नाते

जुलै 2024 मध्येच हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून लोकांना सांगितले होते की, ते दोघे वेगळे झाले आहेत. परंतु ते त्यांचा मुलगा अगस्त्यचा एकत्र सांभाळ करत आहेत. हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत तिच्या मूळ गावी सर्बियाला गेली होती. अगस्त्य हा हार्दिक पांड्यासोबत राहतोय. अलीकडेच नताशा आपल्या मुलासोबत मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर नताशाने आपल्या मुलाला त्याच्या वडिलांकडे म्हणजेच हार्दिक पांड्याकडे पाठवले आहे.

Hardik Pandya and Natasha

अगस्त्य आपल्या आईसोबत सर्बियाला गेला होता

जेव्हा नताशा तिच्या मूळ गावी सर्बियाला गेली होती, तेव्हा ती तिच्या मुलाला घेऊन गेली होती आणि अगस्त्यसोबत क्ववालिटी टाइम घालवत होती. परंतु नताशा मुंबईत आल्यापासून ती तिच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याचे नावही अनेक अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.

हार्दिक आणि नताशा वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहेत

दरम्यान लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेव्हकोविच हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असतील तर अगस्त्याचे काय होईल. तो त्याचा क्ववालिटी टाइम कोणासोबत घालवेल? अगस्त्य आता कोणासोबत राहणार?

हार्दिकने आपल्या मुलाचा एक क्यूट फोटो शेअर केला

अलीकडेच हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या मुलाचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अगस्त्य गणपतीसोबत छान फोटोत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना हार्दिकने त्याच्या कॅप्शनमध्ये एक दिल आणि एक क्यूट स्मायली देखील शेअर केली आहे. फोटो पाहून लोक असा अंदाज लावत आहेत की, सध्या अगस्त्य त्याचे वडील हार्दिकसोबत राहत आहे आणि नताशा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

आपल्या मुलाला विसरून नताशा स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे

लोकांना असेही वाटते की, सर्बियाहून भारतात परतल्यानंतर नताशा स्टॅनकोविक आपला मुलगा अगस्त्याला विसरून फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच नताशा अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत दिसली होती आणि नताशा शेअर करत असलेल्या सर्व पोस्टमध्ये ती एकटी दिसत आहे. यावरून नताशा सध्या स्वत:वर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हार्दिक आणि नताशाच्या डेटिंगच्या बातम्या

हार्दिक आणि नताशा या दोघांनीही जेव्हापासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून दोघांची नावे आणखी एका व्यक्तीशी जोडली जात आहेत. हार्दिकबद्दल असे बोलले जात आहे की, तो ब्रिटीश गायिका जास्मिन वालियाला डेट करत आहे. अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत नताशाही खूप आनंदी दिसत आहे. मात्र दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लोक त्यांचा छोटसं गोड बाळ अगस्त्याची काळजी करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+