IND vs ENG टेस्ट मॅच : लॉर्ड्समध्ये बॉयफ्रेंडसोबत दिसली कृती सॅनन, 'या' सेलिब्रिटींचीही खास हजेरी!
Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनन सध्या तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बाहियासोबतच्या नात्यांमुळे चर्चेत आली आहे. कारण, काल झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दोघेही एका स्टँडमध्ये एकत्र बसलेले दिसले. त्यामुळे कृतीच्या प्रेमसंबंधीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
कृती सॅनन-कबीर बाहिया एकत्र!
कृती सॅनन-कबीर बाहिया यांनी एकत्र कसोटी सामना पाहिला आहे. स्टेडियममधून काढलेले फोटो आता इंटरनेटवर ट्रेंडिंग होत आहेत, ज्यामध्ये कृती सॅनन आणि कबीर बाहिया एकमेकांसोबत हसत-हसत सामना एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोंमुळे त्यांच्या नात्यातील चर्चांना आता आणखी बळकटी मिळाली आहे.

कोण आहे कबीर बाहिया?
कबीर बाहिया व्यवसायाने एक व्यावसायिक आहे आणि लंडनमध्ये त्याचा व्यवसाय सांभाळतो. जरी त्याला ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहणे आवडते, तरी कृती सॅननसोबतची त्याची वाढती जवळीक अनेकदा चर्चेत असते. तर कृतीने देखील तिच्या या नात्यासंबंधाबाबत कधी खुलेपणाने चर्चा केलेली नाही. परंतु, अनेकदा ती त्याच्यासोबत दिसत असल्याने त्यांचे डेटिंग सुरू असल्याची चर्चा वारंवार सोशल मीडियावर होत असते.
कबीर-कृतीचे प्रेमसंबंध?
कबीर बाहिया आणि कृती सॅनन यांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. कबीर त्यांच्या अनेक सुट्ट्यांमध्ये कृतीसोबत पाहायला मिळाला. त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाले आहेत.
यापूर्वीही, दोघेही बेंगळुरूमध्ये एका मित्राच्या लग्नात एकत्र दिसले होते. त्या लग्न समारंभातील एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये दोघेही काळ्या पोशाखात दिसले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
Bollywood star Akshay Kumar is in attendance at the Lord's for Day 5️⃣ of the third Test between England and India alongside Ravi Shastri 💥🏏 #ENGvIND #Tests #Lords #Insidesport #CricketTwitter#INDvsENG pic.twitter.com/o2gXVrDHXz
— RO_KO 🏏 (@MohammadFa83199) July 14, 2025
अक्षय-ट्विंकल अन् रवी शास्त्रींची उपस्थिती?
या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान, बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना देखील स्टँडमध्ये उपस्थित होते. दोघेही माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रींसोबत दिसले आणि त्यांचे फोटो इंटरनेटवरही खूप व्हायरल झाले आहेत.
भारताचा पराभव, इंग्लंडची २-१ अशी आघाडी
दुसरी बाब म्हणजे, सामन्याबाबत विचार केला तर लॉर्ड्सवर खेळलेला हा तिसरा कसोटी सामना भारतासाठी निराशाजनक होता. संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
जरी भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी काही काळ किल्ला लढला असला तरी ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. या विजयासह, इंग्लंडच्या संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications