Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sunita Ahuja: 'मी सती सावित्री नाहीये, मी सगळं केलंय!', गोविंदाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा!

Govinda wife sunita ahuja Big reveal : बाॅलीवूडमध्ये अनेक अशा गोष्टी आणि वक्तव्य सध्या सुरुयं...की, त्यामुळे काही ना काही वाद अन् खुलासे होत आहेत. दिग्गज अभिनेता गोविंदा आणि त्याची अर्धांगिणी सुनीता आहुजा घटस्फोट घेणार अशा चर्चा मागे सुरु होत्या. त्यातच आता नवीन आणि धक्कादायक खुलासा गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी केला आहे.

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या जोडप्याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. गोविंदा आणि सुनीता आहुजाचे नाते संपुष्टात येणार होते आणि दोघांच्या घटस्फोटापर्यंत चर्चा रंगल्या होत्या, यासंदर्भात वृत्तही झळकले होते. नंतर सुनीता आहुजा यांनी स्वतः या अफवा फेटाळून लावल्या आणि त्यांच्या नात्याचे सत्य लोकांसमोर उघड केले.

govinda wife sunita ahuja Big reveal

गोविंदाच्या यशामागे आणि बहुतांश निर्णयात त्याची पत्नी सुनीता आहुजा हिचे मोठे योगदान आहे. अनेकदा तिच्या वैयक्तिक गोष्टी कॅमेऱ्यासमोर शेअर सुनीता आहुजा दिसतात. एका जुन्या मुलाखतीत सुनिता आहुजा यांनी लग्नानंतर त्यांच्यात झालेल्या बदलांबद्दल अनेक खुलासे केले होते.

गोविंदाबद्दल काय म्हणाल्या सुनिता आहुजा?

सुनीता आहुजा यांनी जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, गोविंदा हा त्यांचा बालपणीचा मित्र आहे आणि तेव्हापासून एकमेकांवर प्रेम करतो त्याचे प्रेम खूप शुद्ध आहे. आम्ही 15 वर्षांचे असताना भेटलो, नंतर प्रेमात पडलो आणि नंतर लग्न केले. त्यावेळी प्रेमात सगळं ठीक वाटत होतं. गोविंदा जे काही सांगेल ते मी करेन असे वाटत होते. त्याने जे काही सांगितले त्याला मी ठीक आहे असे म्हणेन.

सुनिता आहुजांनी सांगितले तरुणपणातील किस्से

सुनीता आहुजा म्हणतात, लग्नाच्या वेळी मी गाय होते. लग्नानंतर मी बैल झाले. मला दोन शिंगे वाढली. यानंतर, दोन मुलं जन्माला आली. हळूहळू काळ बदलू लागला. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक योग्य वय असते. एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत खूप पार्टी करायचो.

अशावेळी वेळेचे महत्व खूप

सुनीता आहुजा म्हणाल्या होत्या की, मीही आयुष्यात खूप काही पाहिले आहे. मग असा काळ येतो जेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ द्यावा लागतो, संस्कारांकडे लक्ष द्यावे लागते आणि तुमच्या मुलांना योग्यरित्या वाढवावे लागते.

'तरुणाईच्या काळात सती सावित्री नव्हती'

सुनीता आहुजा म्हणाल्या की, मीही तारुण्यात सती सावित्री नव्हतो. मी खूप काही केले आहे. आम्ही दिवसरात्र पार्टी केली. मी मित्रांसोबत प्रवास करण्यापासून ते क्लबमध्ये जाण्यापर्यंत सर्व काही केले आहे. पण प्रत्येक गोष्टीचे एक योग्य वय असते. आता मी माझ्या कुटुंबात व्यस्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+