Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम; गणरायांचे आगमन अन् गोविंदा-सुनीता आहुजा आले एकत्र!

Govinda Sunita Ganesh Chaturthi celebration 2025 : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. बुधवारी, मुंबईत मीडियासमोर येत त्यांनी आपल्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचे संकेत दिले.

सुनीता आहुजांचा संताप!

जेव्हा एका छायाचित्रकाराने घटस्फोटाच्या अफवांबद्दल सुनीता आहुजा यांना विचारले, तेव्हा त्या चांगल्याच संतापल्या. त्यांनी थेट प्रश्न विचारला, "तुम्ही वाद ऐकण्यासाठी आला आहात की गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आला आहात?" त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्यात कोणताही वाद नाही. फेब्रुवारीपासून सोशल मीडियावर या बातम्या पसरत असल्या तरी त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Govinda and Sunita Ahuja

वकिलांचे स्पष्टीकरण

मागील आठवड्यात जेव्हा पुन्हा या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनीही स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी सांगितले की, "कोणताही खटला नाही. सर्वकाही सोडवले जात आहे. लोक जुने मुद्दे पुन्हा उपस्थित करत आहेत." यावरून हे स्पष्ट होते की, या अफवा जुन्या घटनांवर आधारित आहेत.

घटस्फोटाच्या चर्चा का सुरू झाल्या?

या चर्चा सुरू होण्यामागे सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत केलेले विधान कारणीभूत ठरले. त्यांनी विनोद करताना म्हटले होते की, 'मी त्याला (गोविंदाला) सांगितले आहे की पुढच्या जन्मी तो माझा नवरा होऊ नये.' त्यांनी कामामुळे एकमेकांना वेळ देता येत नसल्याबद्दलची खंतही व्यक्त केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता यांनी काही काळापूर्वी 'विभक्ततेची नोटीस' पाठवली होती, पण नंतर त्यांच्यात समेट झाला. ही जुनी घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्याने गैरसमज निर्माण झाला होता.

कधी झाले होते लग्न!

गोविंदा आणि सुनीता यांचे मार्च १९८७ मध्ये लग्न झाले होते. त्यांची मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन यांचा जन्म झाल्यानंतर हे नाते अधिकृतपणे समोर आले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकत्र येऊन, या जोडप्याने आपल्या नात्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+