गोल्डन ग्लोब अवार्ड: हाॅलीवूडमध्ये ओवेन कुपरचा डंका; प्रियांका चोप्राचा जलवा! वाचा विजेत्यांची यादी
Golden Globe Awards 2026 : हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२६' चा सोहळा कॅलिफोर्नियातील बेवर्ली हिल्टन हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. या ८३ व्या सोहळ्यात चित्रपटांपासून ते वेब सिरीजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्यात आला. जगप्रसिद्ध कॉमेडियन निक्की ग्लेजर हिने सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आपल्या खास शैलीत रंगत आणली.

ओवेन कूपरचा ऐतिहासिक विजय
यावर्षीच्या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो म्हणजे अवघ्या १६ वर्षांचा अभिनेता ओवेन कूपर. 'अॅडोलसेन्स' या टीव्ही सिरीजमधील दमदार अभिनयासाठी त्याला 'बेस्ट अॅक्टर'चा पुरस्कार मिळाला. इतक्या लहान वयात हा पुरस्कार जिंकून ओवेनने इतिहास रचला असून, हॉलिवूडचा भविष्यातील सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
रेड कार्पेटवर 'देसी गर्ल'चा जलवा
भारतीय चाहत्यांसाठी हा सोहळा अधिक खास ठरला, कारण ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पती निक जोनाससोबत पोहोचलेल्या प्रियांकाने आपल्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाने या सोहळ्यात 'प्रेझेंटर'ची भूमिका पार पाडली.
विजेत्यांची यादी (महत्त्वाचे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: पॉल थॉमस अँडरसन (वन बॅटल आफ्टर अनदर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (ड्रामा): ओवेन कूपर (अॅडोलसेन्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (म्युझिकल/कॉमेडी): जीन स्मार्ट (हॅक्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: टेयाना टेलर
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: के-पॉप डेमन हंटर्स
सर्वोत्कृष्ट पटकथा: पॉल थॉमस अँडरसन
सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंटचा मान 'सिनर्स' (Sinners) या चित्रपटाला मिळाला, तर स्टीफन ग्राहम यांना लिमिटेड सिरीजमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आले.












Click it and Unblock the Notifications