छोटी टेडीबेअर सनीच्या खिशातच असते... चित्रपट कलाकारांनाही आहे टेडीबेअरची हौस, वाचा किस्से...
गेल्या अनेक दशकांपासून टेडीबेअर हे प्रेमाचे, सांत्वनाचे आणि आपुलकीचे प्रतिक मानले जाते. गेल्या दशकभरात असाच कुणीच नसेल ज्याचे बालपण टेडीसोबत गेले नसेल. अगदी चित्रपट अभिनेत्यांनाचेही टेडीबेअर प्रेमाबाबतचे अनेक किस्से चर्चेत आले आहेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये आज टेडीबेअर डे साजरा केला जात आहे. यानिमित्ताने चित्रपट अभिनेत्यांच्या टेडीप्रेमाविषयी आपण माहिती जाणून घेऊयात...

सनी तर खिशात ठेवतो छोटा डेडी
करण जोहरच्या काँफी विथ करण या कार्यक्रमात अभिनेता सनी देओलने त्यांचे टेडीबेअर प्रेम व्यक्त केले. त्याने त्याची डेडीविषयीची भावना जगासमोर आणली. या कार्यक्रमात होस्ट करण जोहरने अॅक्शन स्टार सनी देओलबद्दलचे एक मजेदार किस्से उघड केले. सनीची ओळख सांगताना करण जोहरने म्हणाला, "जो माणूस हँडपंपने देश उद्ध्वस्त करू शकतो तो प्रत्यक्षात टेडी बेअरच्या प्रेमात असू शकतो, हे कोणाला माहित आहे का?" सनी देओलने त्यावर अगदी मनमोकळे उत्तर दिले. तो म्हणाला, "मला टेडी नेहमीच आवडतात. एक चांगला टेडी बेअर मी जेव्हा पाहतो तेव्हा तो अक्षरशः उचलून नेतो. प्रत्येक ठिकाणावरुन आणलेला चांगला टेडीबेअर माझ्या घरात आहे. मी त्यांच्याशी बोलतो. गप्पाही मारतो. एक छोटासा टेडी बेअर मी अनेकदा माझ्या खिशातही ठेवतो."
एरिका फर्नांडिस
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही कलाकार एरिका फर्नांडिसला सॉफ्ट टॉयजची विशेषतः टेडी बेअर्सची प्रचंड आवड आहे. तिच्या घरात साँफ्ट टाँयचा मोठा संग्रह आहे. एका मोठ्या टेडी बेअरला मिठी मारल्याचे फोटो तिच्या इन्सालाही दिसतात.
कनिका मान
तुम्ही कनिका मानला ओळखता ना, हो तिच तुमसे ना हो पायेगामधली... कनिकाचेही टेडीज एक अनोखे नाते आहे. तिने नुकत्याच केलेल्या गोव्याच्या सहलीला तिच्या ड्रेसवर मॅचिंग होईल अशी टेडीबॅग घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सॉफ्ट टॉईज भावनिक आणि स्टायलिश असतात, असे ती म्हणते.
अनन्या पांडे
अभिनेत्री अनन्या पांडेही तिच्या खेळकर व खोडकर वृत्तीने प्रसिद्ध आहे. आपण अजूनही मनाने लहानच आहोत, हे ती अनेकदा सांगते. तिच्या इंस्टाग्रामवर मोठ्या टेडीबेअरला मिठी मारल्याचे अनेक फोटो दिसतात.
अक्षय कुमार
बॉलीवूड सुपरस्टार व रफ अँण्ड टफ अभिनेता असलेल्या अक्षय कुमारलाही टेडीबेअर खूप आवडतात. व्हेलेंटाईन वीकमधील टेडीबेअर डेच्या निमित्ताने अक्षय कुमारचे डेडीबेअरसोबतचे फोटोही अनेकदा व्हायरल झाले आहेत.
हिना खान
मालिका आणि चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानही टेडीबेअरची प्रेमी आहे. तिने अनेकदा स्वतः या प्रकाराची कबुली दिली आहे. तिच्या अकाऊंटवरुन ती अनेकदा आपल्या टेडीबेअरसोबत पोज देताना दिसली आहे.












Click it and Unblock the Notifications