Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फवाद खान पाकिस्तानात ट्रोल, युजर्स म्हणाले- त्याला बॉलिवूडने घेऊन जावे आम्हाला गरज नाही

Fawad Khan Trolls: पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे ही बातमी समोर आली. यादरम्यान त्याचा चित्रपटही भारतात प्रदर्शित होणार आहे. या मुद्द्यावरुन फवादखान ट्रोल पाकिस्तानमध्ये ट्रोल झाला आहे. बॉलिवूडने फवाद खानला घेऊन जावे पाकिस्तानला त्याची गरज नाही अशी टीका त्याच्यावर आता होत आहे.

अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत फवादच्या रोमँटिक चित्रपट भारतात रिलिजसाठी तयार असतानाच पाकिस्तानमध्ये मात्र वादळ उठले आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या बॉलीवूडमधील पुनरागमनामुळे त्याच्या देशात संताप आहे.

Fawad Khan

फवाद खान ट्रोल

एका बॉलिवूड प्रोजेक्टचा भाग असल्यानं फवाद खानला पाकिस्तानमध्ये ट्रोल केलं जात आहे. पण या ट्रोलिंगचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध याचा काही संबंध नाही किंवा उरी हल्लास पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी या मुद्द्यावरुनही ट्रोलिंग नाही तर बाॅलीवू़ड एंट्रीवरुन त्याला ट्रोल कले जात आहे. आता सोशल मीडियावर पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया पाहता फवादला तिकडे विशेष पसंत नसल्यासारखे दिसते.

आम्ही हिरो मानत नाही..

फवाद खानच्या बॉलिवूड प्रोजेक्टची माहिती समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. लोकांचे काय कमेंट केल्या या लोकांची भूमिका काय हे बघितले तर एका युजरने कमेंट केली की, 'आम्ही पाकिस्तानचे लोक या हिरोला मानत नाही, जो पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडचा चाहता आहे, त्याला आम्ही मानत नाही.

पाकिस्तानला फवाद खानची गरज नाही?

एका युजर्सने लिहिले की, 'या सिनेमात LGBTQ कंटेंटही असेल, शेवटी त्याला गे सीन्स खूप आवडतात. एका व्यक्तीने आपला संताप व्यक्त करत लिहिले की, 'अशा संपत्तीपेक्षा मृत्यू चांगला आहे, जो तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान हिरावून घेतो.' तिकडे जाऊ नका.

भारतातील बहुसंख्य लोक पाकिस्तानी कलाकारांचा तिरस्कार करतात.' एका ट्रोलरने म्हटले आहे की, 'फवाद खान काय आणि कोणासोबत काम करतो यात आम्हाला आधीच रस नाही. खरं तर, आम्ही त्याचा तिरस्कार करतो आणि त्याच्यावर बहिष्कार टाकतो.' एका ट्रोलरने हसून टिप्पणी केली, 'रिद्धी डोगरा, फवाद खानसाठी असे दिवस आले आहेत की तो एका छोट्या टीव्ही अभिनेत्रीला घेऊन येण्यास तयार आहे.' बॉलीवूडमध्ये काम करतो आणि स्वत:ची खिल्ली उडवत असतो. पाकिस्तानला आता फवाद खानची गरज नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+