बॉलिवूडमधील या दोन दिग्गज कलाकारांचा आज वाढदिवस, गिफ्ट पाहून अभिनेता झाला जाम खूश
Farah Khan - Farhan Akhtar Birthday : आज बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकरांचा वाढदिवस आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता फरहान अख्तरचा या दोघांचा आज 9 जानेवारी 2025 रोजी वाढदिवस आहे. या खास दिवशी फराहने फरहानला एक खास भेट दिली आहे. ही भेटवस्तू पाहून तो खूप खूश झाला आहे.
फराह खानने त्याला त्याच्या आवडत्या 'क्रांती' चित्रपटाची डीव्हीडी भेट दिली आहे. हे पाहून फरहानने गाणं गाताना दिसत आहे. फरहानला मिळालेलं हे गिफ्ट प्रचंड आवडलेलं आहे. त्याच वेळी, बहीण झोयानेही वाढदिवसाची पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो सौजन्य- पीटीआय
फराहने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये फरहान त्याच्या 51 व्या वाढदिवसाची गिफ्ट उघडताना दिसत आहे. या व्हिडीओ म्हणते फराह म्हणते की,'फरहान तुझा वाढदिवसाचं गिफ्ट!' जेव्हा फरहानने 'क्रांती'ची डीव्हीडी पाहिली तेव्हा तो आनंदाने क्रांती-क्रांती हे गाणं गाऊ लागला. त्यावेळी सर्वजन आनंद साजरा करताना दिसत आहेत. फराहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'छोट्या भावाला काय गिफ्ट देयचं आहे, त्याच्याकडे सर्वकाही आहे!'
हा मजेदार व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना खूप आनंद झाला. एका यूजरने लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा!' व्हिडिओ खूप मजेदार होता!' दुसऱ्याने म्हटलं की, 'या कुटुंबातील हस्सी मजाक खूप गोड आहे, फरहान आणि फराहला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'
फरहान अख्तरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या आगामी '120 बहादूर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश 'राजी' घई करत आहेत. हा चित्रपट युद्धावर आधारित आहे. जो 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजच्या बॅनरखाली याची निर्मिती केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications