'हरणाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षाचा होता,आता तुरुंगात',राम वर्मा कोणावर संतापले?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा हत्या करण्यात आली.या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. लॉरेन्स ग्रुपच्या एका गुंडाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची जबाबदारी घेतली. त्याने आपल्या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेखही केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या खूप चर्चा होत आहे.
राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "एक वकील आधी कसा गुंड बनला. आता देशातील सर्वात मोठ्या स्टारच्या मागे लागला आहे. त्याला हरणाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. त्याच्या टोळीतील 700 लोकांनी त्याला आधी धमकावलं, ज्यांना फेसबुकवरून नियुक्त केलं आहे. मग तो एका मोठ्या नेत्याला मारतो. जो या स्टारच्या अगदी जवळचे होते. पोलिसही त्याला पकडू शकलेले नाहीत. कारण तो सरकारच्या संरक्षणाखाली तुरुंगात आहे. त्याचे प्रवक्ते परदेशातून बोलतात. अशी स्क्रिप्ट बॉलीवूडमध्ये लिहिली असती तर आम्ही त्याची खिल्ली उडवली असती. याला कचरा, असेही म्हणतात कारण त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही",असं राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटलं आहे.

त्याचा एकच उद्देश
यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, लॉरेन्स बिश्नोई 1998 मध्ये 5 वर्षांचा मुलगा होता. तेव्हा हरणाचा बळी गेला. लॉरेन्सने 25 वर्षे राग मनात ठेवला आहे. आता तो 30 वर्षांचा झाला आहे, त्याच्या आयुष्यात एकच ध्येय आहे, जे सलमान खानला मारणे हे आहे. हरणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी. हे प्राण्यांवरचे प्रेम आहे की देवाची चेष्टा आहे?
LAWRENCE BISHNOI was just a 5 YEAR OLD KID when the deer was killed in 1998 and Bishnoi maintained his grudge for 25 years and now at age 30 he says that his LIFE’S GOAL is to kill SALMAN to take REVENGE for KILLING that DEER .. Is this ANIMAL love at its PEAK or GOD playing a… https://t.co/KGiOSojxfT
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 14, 2024
राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटद्वारे सरकार आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा समाचार घेतला आहे. तसेच त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडिया यूजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. बाबा सिद्दीकी प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन शुटरचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications