धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक धमाका! 21 दिवसांत 1000 कोटींचा आकडा पार; रणवीर सिंगने रचला नवा इतिहास
Dhurandhar Box Office Collection Day : बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. प्रदर्शनापासूनच चर्चेत असलेल्या या स्पाई-थ्रिलर चित्रपटाने अवघ्या २१ दिवसांत जगभरात १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यासह १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा बॉलिवूडचा चौथा चित्रपट ठरला असून, रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

बॉक्स ऑफिसवरील कमाईची आकडेवारी
चित्रपट निर्मात्यांनी शेअर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, २१ दिवसांतील 'धुरंधर'चे एकूण जागतिक कलेक्शन १००६.७० कोटी रुपये झाले आहे.
- पहिला आठवडा: २१८ कोटी रुपये
- दुसरा आठवडा: २६१.५० कोटी रुपये
- ख्रिसमस डे (२५ डिसेंबर): २८.६० कोटी रुपये (एका दिवसाची कमाई)
भारतातील एकूण कमाई: ६६८.८० कोटी रुपये
- 'धुरंधर'ने मोडले मोठे रेकॉर्ड्स
- चौथा बॉलिवूड चित्रपट: 'दंगल', 'पठाण' आणि 'जवान'नंतर १००० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे.
- रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ला मागे टाकले: रणबीर कपूरचा 'ॲनिमल' चित्रपट ९१५ कोटींवर असताना 'धुरंधर'ने १००० कोटींचा टप्पा वेगाने गाठला आहे.
दिग्दर्शन आणि तगडी स्टारकास्ट
'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. या स्पाई-थ्रिलरमध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांना थरारक पद्धतीने मांडण्यात आले आहे. रणवीर सिंगसोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने या चित्रपटाला उंचीवर नेऊन ठेवले आहे.
'धुरंधर' ओटीटी रिलीज: कधी आणि कुठे?
ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform)
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) या प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. यासाठी मोठी रक्कम मोजण्यात आल्याची चर्चा आहे.
OTT वर प्रदर्शनाची तारीख काय?
चित्रपटगृहात अद्यापही चित्रपटाची घौडदौड सुरू असल्यामुळे, निर्मात्यांनी लगेच ओटीटीवर चित्रपट न आणण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी तो ओटीटीवर येतो. यानुसार, 'धुरंधर' फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications