'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग

Dhurandhar 2 advance booking record box office collection : दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ७ मार्च रोजी या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच चाहत्यांनी तिकीट खिडकीवर अक्षरशः उड्या घेतल्या. पहिल्या २४ तासांतच या चित्रपटाने कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून, चाहत्यांमधील 'क्रेझ' स्पष्टपणे दिसून येत आहे.

Dhurandhar 2 advance booking record

२४ तासांत विकली गेली १.३५ लाख तिकिटे!

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी होणाऱ्या 'पेड प्रिव्ह्यू' शोसाठी पहिल्या २४ तासांत १,३५,१०२ ऑनलाइन तिकिटांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद हिंदी भाषेला मिळाला असून, एकट्या हिंदी व्हर्जनसाठी १,२८,९५३ तिकिटे आरक्षित झाली आहेत. याशिवाय तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोट्यवधींची कमाई आणि तगडी स्टारकास्ट

ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने सुमारे ८.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर ब्लॉक सीट्सचा विचार केला, तर हा आकडा १३.२५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांसारखी तगडी स्टारकास्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'धुरंधर' (भाग १) ची एकूण कमाई

२०२५ मध्ये प्रदर्शित झालेला 'धुरंधर' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरला होता. या चित्रपटाने जगभरातून सुमारे ५५० ते ६०० कोटी रुपयांच्या आसपास एकूण कमाई केली होती. पहिल्या भागाच्या या अफाट यशामुळेच आता 'धुरंधर २' कडून प्रेक्षकांच्या आणि ट्रेड अॅनलिस्टच्या अपेक्षा कैक पटीने वाढल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+