Devara Box Office Collection Day 1: ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई
Devara Box Office Collection : 27 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर 'देवरा- 1' या चित्रपटाच्या कमाई बद्दल प्रेक्षकामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अनेक बॉलीवूडमधील कलाकार आहेत. कोरतला शिवाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या हा चित्रपट बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट आहे. यामध्ये जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत अभिनय करताना दिसत आहे. यात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती.
'देवरा-भाग 1' या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने आधीच सिद्ध केले होते की, तो कमाईच्या बाबतीत स्त्री 2 ला मागे टाकणार आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपट पाहण्यासाठी कला प्रेमींची झुंबड उडाली आहे. चित्रपटाच्या ओपनिंगबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाला चांगलीच बंपर ओपनिंग मिळाली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे, सकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये तब्बल 77 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने 68.9 कोटींची कमाई केली आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली असून कन्नडमध्ये 3 कोटींचा व्यवसाय केला आहे.
तमिळमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 0.8 कोटी रुपयांचे तर मल्याळममध्ये 0.3 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. मात्र या आकडेवारीनुसार हे आकडेही बदलू शकतात. देवराच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट समुदायावर आधारित ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्युनियर एनटीआरने या चित्रपटात वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. जेव्हा जान्हवी कपूर चित्रपटात थंगमची भूमिका साकारत आहे.












Click it and Unblock the Notifications