Deepika Padukone: दीपिका पदुकोण L&T च्या चेअरमनवर संतापली, म्हणाली- इतके वरिष्ठ असूनही ...
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रसिद्ध कंपनी एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी केलेल्या विधानावर दीपिका पदुकोणने संताप व्यक्त केला आहे. दीपिकाने सुब्रह्मण्यम यांच्यावर निशाणा साधला आहे .
एसएन सुब्रमण्यम यांचे वादग्रस्त विधान
अलिकडेच एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असं म्हटलं होतं. सुब्रमण्यम म्हणाले की कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. हे विधान ऐकल्यानंतर दीपिकाने संताप व्यक्त केला आहे.

दीपिका पदुकोणने एसएन सुब्रमण्यमवर व्यक्त केला राग
दीपिका पदुकोणने एसएन सुब्रमण्यमवर राग व्यक्त करणारी एक इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. दीपिकाने तिच्या इंस्टा स्टोरीवरील पत्रकार फैज डिसूझाची पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की - इतक्या उच्च पदांवर असलेल्या लोकांचे असे विधान धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे.
'कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे'
एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रविवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही, याबद्दल त्यांना वाईट वाटते. खरंतर अध्यक्षांना विचारण्यात आले होते की, त्यांची कंपनी अब्जावधींची असूनही ते कर्मचाऱ्यांना शनिवारी का कामावर ठेवतात? यावर अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी 90 तास काम करावे असं त्यांनी म्हटलं होते.
'किती दिवस बायकोच्या चेहऱ्याकडे पाहत राहणार?'
त्याच संभाषणादरम्यान, एसएन सुब्रह्मण्यम पुढे म्हणाले- जर मी रविवारी काम करू शकलो तर मला आनंद होईल कारण मी स्वतः रविवारी काम करतो. लोकांनी रविवारी ऑफिसला जावे. घरी राहून तुम्ही काय कराल? किती दिवस बायकोच्या चेहऱ्याकडे पाहत राहणार?
एसएन सुब्रमण्यम यांच्यावर टीका
मिळालेल्या माहितीनुसार एसएन सुब्रमण्यम यांच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. एल अँड टी चेअरमन यांनी की, चीनने अशाच पद्धती अवलंबून अमेरिकेच्या पुढे पाऊल टाकले आहे. चिनी लोक आठवड्यातून 90 तास काम करतात, तर अमेरिकन लोक आठवड्यातून फक्त 50 तास काम करतात.












Click it and Unblock the Notifications