दीपिका-रणवीर बनले आई-बाबा! दीपिकाला झाले कन्यारत्न, काल रुग्णालयात केले होते दाखल
Deepika padukone And Ranveer Singh : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आई बाबा झाले आहेत. दीपिकाने एका मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीला शनिवारी दुपारी मुंबईतील गोरेगाव परिसरातील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि कुटुंबातील सदस्य होते. तर आज दीपिकाने एका मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने एक पोस्ट शेअर करत लिहिले की ती सप्टेंबर 2024 मध्ये नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे.
गणेशोत्सव काळात अभिनेत्री दीपिका पादुकोणने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून दीपिका तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. गरोदरपणात तिने 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा केलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्यप्रसाधनाच्या प्रॉडक्ट्सची जाहिरातसुद्धा ती करत होती. इतकंच नव्हे तर गरोदरपणात ती काय खात होती आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करत होती, याविषयी तिने सोशल मीडियाद्वारे सातत्याने चाहत्यांना माहिती दिली होती.












Click it and Unblock the Notifications