माधुरीच नाही तर 'या' 3 अभिनेत्रींशीही जोडले होते दाऊदचे नाव; नंतर अभिनेत्री गायब कशा झाल्या? वाचा

भारतातील सर्वात चर्चेतला डाॅन म्हणून दाऊद इब्राहीमला ओळखले जाते. बाँम्बस्फोट असो किंवा इतर देशविघातक कारवाया असो, दाऊदने भारतीयांना चांगलेच सतावले होते. ९० च्या दशकात तर बॉलिवूडही अंडरवर्ल्डच्या देखरेखीखाली होते. निर्मात्यांसह नायक-नायिकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही अंडरवर्ल्डचा प्रभाव होता. याच अंडरवर्ल्डने काहींच्या करिअरला चालना दिली, तर काहींचे करिअर उद्ध्वस्त केले. दाऊदचेही बाॅलिवूडच्या अनेक नायिकांसोबत नाव जोडले गेले. त्या अभिनेत्री कोणत्या होत्या तेच आपण पाहूयात..

Dawood Ibrahim s affairs

अंडरवर्ल्ड- बाॅलिवूडचे नाते

अभिनेत्री मोनिका बेदीने स्वतः अबू सालेमसोबतचे तिचे अफेअर सांगितले. ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीची प्रेमकहाणीही सर्वश्रूत होती. या सर्वांत दाऊदचे अफेअर्स सर्वात जास्त चर्चेत राहिले. दाऊद इब्राहिमचे नाव फक्त माधुरी दिक्षीतच नाही, तर तीन सुंदरींसोबतचे जोडले गेले होते. सुरुवातीला दाऊद 'राम तेरी गंगा मैली' मधील अभिनेत्री मंदाकिनीच्या सौंदर्यानेही प्रभावित झाला होता. मंदाकिनीही त्याच्या प्रेमात होती. आजही त्या दोघांचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. पण नंतर काहीतरी बिनसले आणि त्यांच्यातील जवळीक संपली आणि त्यांचे प्रेम संपले.

दुसऱ्या प्रेमासाठी निर्मात्याचा खून

दाऊदशी संबंध तुटल्यानंतर मंदाकीनीने नेपाळमधील एका लामा डॉक्टरशी लग्न केल्याचे सांगितले गेले. त्यानंतर दाऊदच्या आयुष्यात पाकिस्तानवरुन बाॅलिवूडमध्ये आलेली अनिता अयुब आली. या दोघांमधील प्रेमही फुलले. त्यानंतर अनिताला काम दिले नाही म्हणून दाऊद गॅगने निर्माता जावेद सिद्दीकीची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येनंतर या दोघांमधले अफेअर जगजाहीर झाले. त्यानंतर मात्र अनिता अयुबवर भारतासाठी हेरगिरी केल्याचा आरोप झाला. या आरोपानंतर अनिता आयुब कोठे गायब झाली, हे कोणालाच माहित नाही. ती जिवंत आहे की तिचा खून झाला, हेही कुणालाच माहित नाही.

पाकिस्तानातही दाऊदचे अफेअर

अनिता अयुबनंतर दाऊद पाकिस्तानात पळाला. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातशी त्याचे नाव जोडले गेले. मेहविश ही एक पाकिस्तानी आयटम गर्ल होती. दाऊदशी जोडल्यानंतर तिचे नशीब एका रात्रीत चमकले. तिला मुख्य भूमिका मिळू लागल्या. महविश हयात ही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याही जवळची होती. तिला पाकिस्तानात मोठा नागरी सन्मानही मिळाला होता. दाऊद व मेहविशने अनेक रात्री दुबईत घातल्याचे सांगितले गेले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+