Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर छपरफाड कमाई, पाचव्या दिवशी अजय देवगणच्या 'शैतान'चा विक्रम मोडला

Chhaava Box Office Collection Day 5: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांवर निर्मित छावा या चित्रपटाचा बोलबाला महाराष्ट्रातच नाही तर देशात होत आहे. या चित्रपटाला पाचव्या दिवशी ही चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाने कमाईच्या बाबतीत पाचव्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

छावा या चित्रपटात विकी कौशल्य व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम करत आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या कमाईच्या गतीवरून हे सिद्ध झाले आहे की, हा चित्रपट या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांतच आपले बजेटचा ओलांडला आहे. छावा चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी कमाईत प्रचंड वाढ झाली आहे.

Chhaava

छावा चित्रपटाने कोणत्या दिवशी किती केली कमाई?

- बॉक्स ऑफिस रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर 'छावा'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई केली होती.

- दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात 19.35 टक्क्यांनी वाढ झाली असून 37 कोटींची कमाई झाली आहे.

- तिसऱ्या दिवशी 'छावा'ने 31.08 टक्क्यांच्या उसळीसह 48.5 कोटींचा व्यवसाय केला.

- चौथ्या दिवशी 'छावा' ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार 'छावा'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या मंगळवारी 24.50 कोटींची कमाई केली आहे.

'छावा' ने पाचव्या दिवशी अजय देवगणच्या शैतानाला मागे टाकले

दरम्यान 'छावा'चित्रपटाचे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन 165 कोटी रुपये झाले आहे. 'छावा' चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी अजय देवगणच्या शैतान चित्रपटाचा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलिवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार भारतात 'शैतान'चे लाइफटाइम कलेक्शन 149.49 कोटी रुपये होते. तर 'छावा'ने पाच दिवसांत 165 कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा ओपनिंग आणि विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+