Chhaava Ott Release: विकी कौशलचा 'छावा' ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे पाहायचा चित्रपट?
Chhaava Ott Release: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नव-नवीन विक्रम मोडत आहे. सलग पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपटाच्या जबरदस्त अभिनयाने लोकांना आनंद दिला आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

'छावा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'छावा' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी 11 एप्रिल 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. अशा परिस्थितीत ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहता आला नाही, ते आता घरी बसून तो पाहू शकतात.
लोक ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपट निर्मात्यांनी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा
'छावा' हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. तर रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने मुघल सम्राट औरंगजेबाची शक्तिशाली भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, डायना पेंटी आणि संतोष जुवेकर यांच्याही भूमिका आहेत.
छावाची विक्रमी कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदान्ना यांनी महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ही 559.43 रुपये झाली आहे. ही आकडेवारी मागील आठवड्यातील आहे.












Click it and Unblock the Notifications