Chhawa Box Office Collection Day 9 : छावा चित्रपटाच्या कमाईने मोडले नवीन विक्रम, विकीचाही डंका
Chhawa Box Office Collection Day 9 : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ऐतिहासिक कहाणीवर आधारित असलेला चित्रपट 'छावा' 2025 मधील बॉलीवूडचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. तसेच हा चित्रपट विकी कौशलचा आजपर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'राजी' सारख्या हिट चित्रपटांना मागे टाकले आहे. दुसऱ्या आठवड्यातही 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या शनिवारी कमाईत किती वाढ?
दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत 87.23 टक्क्यांची वाढ झाली. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, 'छावा'ने शनिवारी 44 कोटी रुपये कलेक्शन केले, ज्यामुळे भारतातील एकूण निव्वळ कलेक्शन 286.75 कोटी रुपये झाले.
दुसऱ्या शनिवारी, 'छावा'ने 56.09 टक्के इतकी प्रभावी एकूण ऑक्युपन्सी नोंदवली, संपूर्ण भारतात एकूण 6,530 शो झाले. चित्रपटाची सर्वाधिक ऑक्युपन्सी पुण्यात 774 शोमध्ये 85.75 टक्के होती.
त्यानंतर चेन्नईमध्ये 55 शोमध्ये 81.50 टक्के ऑक्युपन्सी होती. मुंबईत, चित्रपटाने 1,458 शोमध्ये 74 टक्के कमाई नोंदवली. तर दिल्ली-एनसीआरमध्ये 1,241 शोमध्ये 46 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली.
छावा कधी प्रसारित झाला?
छावा 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित हा चित्रपट आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.












Click it and Unblock the Notifications