होळीच्या दिवशी छावाचा आणखी एक रेकॉर्ड, कमाईच्या बाबतीत पुष्पा 2 , स्त्री 2 टाकले मागे
Chhaava Box Office Collection: विकी कौशल्यचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नव-नवीन विक्रम मोडत आहे. सलग पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. आता 'छावा' चित्रपटाने आणखी एक मोठा विक्रम केला आहे.
विकी कौशलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत अनेक मोठे रेकॉर्डही मोडले. छावा रिलीज होऊन 29 दिवस उलटले आहेत. आता होळीच्या सुट्टीचा चित्रपटाला खूप फायदा झाला आहे. 29 व्या दिवशी कमाईच्या बाबतीत विकी कौशलच्या चित्रपटाने मोठी आघाडी घेतली आहे. आता छावाने कमाईच्या बाबतीत पुष्पा 2, स्त्री 2 आणि भूल भुलैया 3 ला मागे टाकले आहे.

विक्की कौशल्यचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दररोज नवे-नवे विक्रम करत आहे. या चित्रपटाने 23 व्या दिवशी 16.75 कोटीचा गल्ला जमवला आहे. तर आता 24 व्या दिवसाची ही कमाई समोर आली आहे. सैकनिकच्या रिपोर्टनुसार 24 व्या दिवशी 11.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'सैकनिल्क'च्या रिपोर्टनुसार 'छावा'ने रिलीजच्या 29 व्या दिवशी 559.43 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 534.2 कोटी आणि तेलुगूमध्ये 'छावा'ने 12.55 कोटी कमावले आहेत.
छावा चित्रपटाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. आता छावाने गदर-2 चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. गदर चित्रपटाचे लाइफटाइम एकूण कलेक्शन 525.7 कोटी रुपये आहे. या सोबतच हा छावा चित्रपट आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10 वा चित्रपट बनला आहे.
छावाची विक्रमी कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदान्ना यांनी महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ही 559.43 रुपये झाली आहे.












Click it and Unblock the Notifications