'छावा'चा महाराष्ट्रातच नाही देशात बोलबाला, विकी कौशलच्या सिनेमाने किती केली कमाई? घ्या जाणून
Chhaava 4 days box office collection : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांवर निर्मित छावा या चित्रपटाचा बोलबाला महाराष्ट्रातच नाही तर देशात होत आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. एवढेच नाही तर बॉलीवूड स्टार विकी कौशल, अक्षय खन्ना यांनी बॉक्स ऑफिसवर विजयाचा झेंडा फडकावला आहे.
छावा चित्रपटाच्या कमाईत झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच हा चित्रपट प्रत्येक दिवसागणिक कमाईच्या बाबतीत नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. एकीकडे चित्रपटाने पहिल्या वीकेंडलाच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता, तरचौथ्या दिवशी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आणखीनच आगेकूच केली आहे.

कोणत्या दिवशी किती केली कमाई?
- बॉक्स ऑफिस रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर 'छावा'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई केली होती.
- दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात 19.35 टक्क्यांनी वाढ झाली असून 37 कोटींची कमाई झाली आहे.
- तिसऱ्या दिवशी 'छावा'ने 31.08 टक्क्यांच्या उसळीसह 48.5 कोटींचा व्यवसाय केला.
- यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या सोमवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.
- Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा' ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- यासह 'छावा'चे चार दिवसांचे एकूण कलेक्शन 140.50 कोटी रुपये झाले आहे. 'छावा' रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड तोडत आहे. हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा ओपनर आणि विकी कौशलच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे.
- चौथ्या दिवशी, 'छावा' हा अभिनेत्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, ज्याने विकीच्या राझीच्या आजीवन कलेक्शनचा विक्रम मोडला आहे.
- राजीचे आजीवन कलेक्शन 123.84 कोटी रुपये होते. त्याचबरोबर 'छावा'ने अवघ्या चार दिवसांत 140 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
रेकार्ड ब्रेक करतोय 'छावा'
आत्तापर्यंत पद्मावत या ऐतिहासीक चित्रपटाच्या नावावर कमाईचा विक्रम होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 114 कोटी तर कलेक्शनमध्ये 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्या तुलनेत छावाने पहिल्या तीन दिवसांतच 121 कोटी कमावले आहेत. तानाजीलाही त्याने मागे टाकले आहे. विकी कौशलच्या चित्रपटाने मुव्ही मॅक्स चेनवर अल्लू अर्जुनच्या पुष्पा- 2 ला मागे टाकले आहे. 'छावा'ने पहिल्या रविवारी 2.04 कोटी रुपयांची कमाई केली. तर 'पुष्पा 2' च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या रविवारी इथून 2.01 कोटी रुपये कमावले होते.
ठरणार पहिला ब्लाँकबस्टर
छावाने पहिल्या रविवारी 49 कोटी कमावले. यावर्षी एकाच दिवसात एवढे कलेक्शन आणणारा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे. यावर्षी अक्षय कुमारच्या स्काय फोर्सने बाँक्स ऑफिसवर 130 कोटी कमावले होते. त्याचे विकेंड कलेक्शन 73 कोटी होते. एवढे पैसे छावाने पहिल्या तीन दिवसांतच कमावले आहेत. छावा इतर अनेक चित्रपटांनाही मागे टाकील, असा अंदाज बांधला जात आहे.












Click it and Unblock the Notifications