भोजपूरी दबंगच्या जर्सीचे अनावरण; आईच्या नावाने मैदानात उतरतील सेलीब्रीटी खेळाडू
सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा 11 वा सीझीन 8 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यात सात संघ सहभागी होणार असून, या स्पर्धेची फायनल मॅच 2 मार्चला होईल. वास्तविक, ही फायनल मॅच कोठे होईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आज गुरुवारी दिल्लीत भोजपूरी अभिनेते रवी किशन व मनोज तिवारी यांनी सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी भोजपुरी दबंग जर्सीचे अनावरण केले.

आठ फेब्रुवारीपासून रंगणार थरार
या जर्सीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला लीग आयोजकांसह प्रमुख प्रवर्तक सुनील शर्मा, कनिष्क साईल, सुशील मलिक आणि राहुल मिश्रा उपस्थित होते. ही स्पर्धा 8 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. त्याचे सामने दिल्ली, हैदराबाद, कटक आणि सुरत सारख्या शहरांमध्ये होतील. भोजपुरी दबंग संघातील प्रमुख खेळाडूंनीही कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. लोकसभा सदस्य, अभिनेता आणि संघाचा कर्णधार मनोज तिवारी, बॉलिवूड आणि भोजपुरी स्टार रवी किशन, मुख्य प्रशिक्षक अक्षरा सिंग आणि ब्रँड अॅम्बेसेडर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सामना भारतीय सैन्याला समर्पित
या जर्सीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला खासदार मनोज तिवारी म्हणाले की, या हंगामात संघातील खेळाडूंच्या आईचे नाव त्यांच्या जर्सीवर लिहिले जाईल. खेळाडूच्या आईच्या नावाने ही जर्सी असेल. तिवारी यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण सामना भारतीय सैन्याला समर्पित असेल. देशातील सर्व नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना आणखी दृढ करण्याचा आमचा उद्देश असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.
सलमान-तिवारीमध्ये सामना
मनोज तिवारी म्हणाले, "आमच्या भोजपुरी दबंगचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला अरुण जेटली स्टेडियमवर होईल. सलमान खानच्या टीमविरुद्ध हा पहिला सामना असेल. सलमान खानच्या टीममध्ये सोहेल खान आणि रितेश देशमुख देखील आहेत. आम्ही पूर्ण तयारीने मैदानात उतरू. ९ फेब्रुवारीचा दिवस दिल्लीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आम्हाला संपूर्ण दिल्लीतील लोकांनी आमच्या सामन्यात सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही पूर्वांचलमधील प्रेक्षकांसाठी खास व्यवस्था केली आहे. तिकिटे मोफत आहेत."
खेलो इंडियाचा संदेश
या सामन्याबाबत अभिनेता रवी किशन यानेही माहिती दिली. तो म्हणाला, "हा एक ऐतिहासिक सामना असेल. सर्व सुपरस्टार आणि स्टार्स मैदानात उतरतील. या कार्यक्रमात बॉलिवूड, भोजपुरी आणि पंजाबी इंडस्ट्रीतील स्टार, गायक आणि इतर कलाकार सहभागी होणार आहेत. आम्ही 'खेलो इंडिया'चा संदेश पसरवण्यासाठी वचनबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ही एक सुरुवात आहे.












Click it and Unblock the Notifications