अंगावर शहारे आणणारे बाॅर्डर-2 चे टीझर! सनी देओलची पुन्हा गर्जना, 'या' तारखेला सिनेमा रिलीज होणार
Border 2 Teaser Released : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित देशभक्तीपर चित्रपट 'बॉर्डर'चा सिक्वेल 'बॉर्डर २' चा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. काल, १६ डिसेंबर रोजी 'विजय दिवसा'चे औचित्य साधून निर्मात्यांनी हा टीझर रिलीज केला आणि सोशल मीडियावर एकाच खळबळ उडाली आहे. सनी देओलची डरकाळी आणि हाय-व्होल्टेज ॲक्शनने चाहत्यांची मने जिंकली असून, हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असे संकेत मिळत आहेत.

कसा आहे 'बॉर्डर २' चा टीझर?
टीझरची सुरुवातच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या डायलॉगने होते. सनी देओल आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये म्हणतो, "तुम जहाँ से भी घुसने की कोशिश करोगे, आसमान से, जमीन से या समुंदर से, सामने एक हिंदुस्तानी फौजी खडा पाओगे!" आणि टीझरचा शेवट होतो त्या ऐतिहासिक वाक्याने- "आवाज कहाँ तक जानी चाहिए... लाहौर तक!" १९९७ मधील मेजर कुलदीप सिंह यांची तीच जिद्द आणि तोच उत्साह पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
चित्रपट कधी रिलीज होणार?
टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 'बॉर्डर २' हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तीन दिवस आधी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
स्टारकास्टची मोठी फौज
- यावेळी सुद्धा 'बॉर्डर २' मध्ये केवळ सनी देओलच नाही, तर बॉलीवूडमधील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
- प्रमुख अभिनेते: सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी.
- प्रमुख अभिनेत्री: सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंह.
- दिग्दर्शन: अनुराग सिंह.
- निर्मिती: जे. पी. दत्ता आणि भूषण कुमार.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे ३०० कोटी रुपये असून हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या वॉर फिल्म्सपैकी एक ठरणार आहे.
काय आहे 'बॉर्डर २' ची स्टोरी?
'बॉर्डर २' हा १९९७ च्या 'बॉर्डर' चित्रपटाचा अधिकृत सिक्वेल आहे. हा चित्रपट केवळ युद्धभूमीवरची लढाई नसून भारतीय सैनिकांचे बलिदान, त्यांचे धैर्य आणि त्यांच्या कुटुंबाची भावनिक कथा मांडणारा आहे. वरुण धवन एका गंभीर सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या व्यक्तिरेखांमधून शौर्याची नवी गाथा पाहायला मिळेल. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या जाबांज सैनिकांना दिलेली एक भव्य मानवंदना असल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे.












Click it and Unblock the Notifications