Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'मुन्नाभाई एमबीबीएस'आणि '3 इडियट्स'चा सिक्वेल बनणार, निर्माता विधू विनोद चोप्रांनी केलं कंफर्म

बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्गदर्शक राजकुमार हिरानी यांनी 3 इडियट्स आणि मुन्नाभाई एमबीबीएस हे चित्रपट केले. पण त्याची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती. जो मागच्या वर्षी 12वीं फेल हा चित्रपट आला होता. यानंतर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली. ज्याचे नाव त्यांनी शून्यापासून सुरू केले आहे. सध्या ते चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान त्यांनी 3 इडियट्स आणि मुन्नाभाई एमबीबीएसच्या सिक्वेलबद्दल भाष्य केलं आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत विधू विनोद चोप्रा म्हणाले की, मी '2 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई 3' या दोन्ही चित्रपटाची कथा लिहित आहे. त्यांच्यासोबतच मुलांसाठीही चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. मी एक अतिशय मनोरंजक हॉरर चित्रपट लिहित आहे, जो कॉमेडीने सुसज्ज असेल. एक-दोन वर्ष कथा लिहीन आणि चित्रपट बनवणार. अशा परिस्थितीत '2 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई 3' लवकरच बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Flim 3 idiots and munna bhai sequels

मी सिक्वेल बनवला असता, पण चित्रपट चांगला झाला नसता

विधू पुढे बोलताना म्हणाले की, मी थ्री इडियट्स आणि मुन्नाभाई एमबीबीएसचे सिक्वेल बनवले असते, तर त्यातून खूप पैसे कमावले असते. मोठं घर आणि गाडी घेतली असती. पण ते चित्रपट चांगले झाले नसते आणि मी त्यांच्याबद्दल बोलतही नाही. पैसे मिळवण्यासाठी मी कामाशी तडजोड करू शकत नाही. आता विधू या चित्रपटांचे सिक्वेल कधी बनवणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजकुमार हिरानी याचे दिग्दर्शन करणार की दुसरे कोणी ते दिग्दर्शन करणार आहे. मात्र, मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत.

विक्रांत मॅसी स्टार झाला

विधू विनोद यांच्या रीस्टार्ट फ्रॉम झिरो या चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा या महिन्याच्या 13 तारखेला प्रदर्शित झाला. त्याचा मुख्य चित्रपट 12वी फेललाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटामुळे विक्रांत मॅसीही रातोरात सुपरस्टार झाला. प्रेक्षकांनीही त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+