बेबी जॉनच्या अपयशामुळे वरुण धवन डिप्रेशनमध्ये ? राजपाल यादवने सांगितलं खरं कारणं
Varun Dhawan : वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला आहे. निर्मात्यांना आणि वरुण धवनलाही हे अपेक्षित नव्हते.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अनेक बातम्या समोर आल्या आहेत. वरुण धवन नैराश्यात असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. आता राजपाल यादवने यावर सत्य सांगितले आहे. 'बेबी जॉन' चित्रपटात राजपालने कॉन्स्टेबल राम सेवकची भूमिका केली आहे.

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवने वरुण नैराश्याच्या बातम्यांबद्दल भाष्य केलं आहे. राजपाल म्हणाला की, वरुण खूप प्रेमळ मुलगा आहे. त्याने खूप मेहनती देखील घेतली आहे. त्याने नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे, कारण जोखीम घेणे ही एक मोठी गोष्ट आहे.
चित्रपटाच्या अपयशाच्या कारणाबद्दल राजपाल म्हणाला, "जर हा चित्रपट थेरीचा रिमेक नसता तर माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीतला तो सर्वोत्तम चित्रपट असता. विजयने हा चित्रपट आधीच केला होता. प्रेक्षकांनी तो पाहिला आहे. त्यामुळे त्याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम झाला आहे. या चित्रपटावर निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली होती.
'बेबी जॉन'हा चित्रपट 180 कोटीच्या बजेट बनला आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटी रुपये कमावले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाला त्याच्या बजेटच्या निम्मेही पैसे वसूल करता आलेले नाहीत. बेबी जॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन कॅलिसने केले होते. त्याची निर्मिती अॅटली यांनी केली आहे. अॅटली यांनी 'थेरी' बनवला होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यात थलापती विजय मुख्य भूमिकेत होता.












Click it and Unblock the Notifications