नॉर्थ नंतर, दक्षिणेत सनी देओलच्या ढाई किलोच्या हाताची ताकद दिसणार, 'जाट' चा दमदार ट्रेलर पहा
Sunny Deol Jaat Trailer Release: 'गदर 2' नंतर सनी देओलने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सनी देओलचा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळतेय. तसेच रणदीप हुड्डाचा अभिनयही जबरदस्त आहे.
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पहायला मिळणार. ट्रेलरची सुरुवात गावात झालेल्या हत्याकांडाने होते. नंतर सैयामी खेर एंट्री होते आणि पोलिसांच्या गणवेशात गावकऱ्यांना घटनेबद्दल विचारपूस करते. पण दुसऱ्या बाजूला एक मूल 'रणतुंगा' (रणदीप हुडा) ओरडतो. खरंतर रणदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय.

सनी देओल डॉयलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली
ट्रेलरमध्ये सनी देओलची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या अभिनेत्याने अनेक दमदार डॉयलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो येताच शत्रूंशी भिडतान दिसतोय. त्याचा एक डॉयलॉग आहे, 'जान की कीमत को जानकर भी जान को जोखिम में डालने वाला...' यानंतर तो पुढे म्हणतो, 'मैं जाट हूं।' याशिवाय ट्रेलरच्या शेवटी असलेला त्याचा आणखी एक संवाद चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे दक्षिण चित्रपटांना आव्हान दिले आहे. यामध्ये तो म्हणाला, 'संपूर्ण नार्थने या ढाई किलोच्या हाताची ताकद पाहिली आहे आणि आता दक्षिणेला ते दिसेल.'
ट्रेलरमध्ये नंतर आपल्याला सनी देओल रणदीप हुड्डासोबत समोरासमोर येताना दिसतो. मिथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबत सैयामी खेर, विनीत कुमार सिंग आणि स्वरूपा घोष असे अनेक कलाकार दिसणार आहेत.
दरम्यान सनी देओलच्या आगामी प्रॉजेक्ट बद्दल बोलयचं झालं तर त्याने शेवटचा 2023 मध्ये 'गदर 2' मध्ये दिसला होता. आता लवकरच तो 'जाट' चित्रपटात दिसणार आहे. तसेच त्याच्याकडे अजूनही अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ज्यामध्ये 'लाहोर 1947' देखील समाविष्ट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रीती झिंटा दिसणार आहे. त्यासोबतच सनी देओल 'बॉर्डर 2' मध्येही दिसणार आहे.












Click it and Unblock the Notifications