जीवे मारण्याच्या धमकीच्या कॉलनंतर सलमानने शेअर केले हे 2 फोटो, धमकी देणाऱ्या व्यक्तीला 24 तासात अटक
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला 14 एप्रिल रोजी पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानबद्दल एक धमकीचा मेसेज देण्यात आला होता. यामेसेज म्हटलं आहे की, सलमानला त्यांच्या घरात घुसून मारण्यात येईल. एवढेच नाही तर भाईजानची गाडी बॉम्बने उडवून दिली जाईल असेही म्हटले होते. यानंतर काही वेळातच भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत.
धमकीनंतर भाईजानने शेअर केले सोशल मिडीयावर फोटो
सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना सलमानने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मॉटिवेशनबद्दल धन्यवाद. या पोस्टमध्ये सलमानने त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सलमान जिममध्ये अॅक्टिव्हिटी करताना खूप सिरीयस दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये भाईजान बॉडी दाखवताना दिसत आहे. सलमानला बॉडी बनवण्याकरिता त्याला किती मेहनत घ्यावी लागली आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरील घामावरून स्पष्ट दिसत आहे.

सलमान खानची सोशल मीडिया पोस्ट. फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम
आता सलमानच्या या पोस्टवर युजर्स आणि सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, सिंह कधीही म्हातारा होत नाही. अल्लाह तुम्हाला अधिक चांगले आरोग्य देवो. सलमान खान अलीकडेच जिममध्ये घाम गाळताना दिसला. सध्या पोलिसांकडून सलमान खानला Y+ श्रेणीची सुरक्षा आहे. तसेच पोलिसांनी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
धमकी देणा-या व्यक्तीला पोलिसांकडून अटक
सलमानला धमकीचा मेसेज देणा-या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. 24 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खानला धमकी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे.
काय होता धमकीचा मेसेज
सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत वृत्तसंस्था एएनआयने पोलिसांचा हवाला देत म्हटले आहे की, वरळी ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲपवर सुपरस्टार सलमान खानसाठी धमकीचा संदेश आला होता की, सलमानला त्याच्या घरात घूसून मारेन. तसेच त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्यात येईल. यानंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. धमकीचा मेसेज हा गुजरातमधील वडोदरा जवळील एका गावातून पाठवण्यात आला होता. त्या व्यक्तीचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत त्या व्यक्तीला 24 तासच्या आत अटक केली आहे.












Click it and Unblock the Notifications