सलमानचा कॅमिओ, ऍटलीचं नाव तरीही बेबी जॉन फेल, पुष्पाची 21 व्या दिवसाच्या कमाईचीही बरोबरी नाही
Baby John BO Collection Day 1 : ख्रिसमसच्या औचित्यावर 25 डिसेंबरला वरुण धवनचा बेबी जॉन चित्रपट मोठ्या धूमधडाक्यात प्रदर्शित झाला. ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला होईल, अशी आशा निर्मात्यांना होती. मात्र असं अजिबातच घडलं नाही.
ट्रेंड वेबसाइट सॅकलिंकनुसार, 'बेबी जॉन'ला जवळपास 12.5 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. वरुणच्या 'जुडवा 2' आणि ABCD 2 ला यापेक्षा मोठी ओपनिंग मिळाली होती. 'बेबी जॉन' चित्रपटाला पहिल्या दिवशी अपेक्षित कमाई न मिळण्यामागे दोन कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे अल्लू अर्जुनचा गाजत असलेला चित्रपट पुष्पा 2.

दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा 2' चित्रपट 05 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सतत नवनवीन विक्रम करत आहे. या चित्रपटाने भारतात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. एवढेच नाही तर हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटगृहात येऊन 21 दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई काही कमी होत नाहीये.
सॅकलिंकच्या मते, 'पुष्पा 2' ने 21 व्या दिवशी सुमारे 19 कोटींची कमाई केली. जबरदस्त माऊथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट सर्व जुने रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी ठरला आहे. बाकी, फक्त 'पुष्पा 2' मुळे 'बेबी जॉन'चे नुकसान झाले असे नाही. तर 'मुफासा: द लायन किंग' हा हॉलीवूडचा चित्रपट देखील 20 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. ख्रिसमसच्या दिवशी मुफासा चित्रपटाने 14 कोटींची कमाई केली.
पुष्पा- 2 आणि मुफासा या दोन्ही चित्रपटांमुळे 'बेबी जॉन' मागे पडल्याचं दिसून आल आहे. मीडिया रिव्ह्यूजमध्ये वरुण आणि कीर्ती सुरेशचे कौतुक केले जात असले तरी हा चित्रपट त्यांना न्याय देत नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. 'बेबी जॉन' हा विजय जोसेफच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. हा तमिळ चित्रपटाचा पूर्ण रिमेक नसून यात काही बदल केले आहेत, असे वरुणने सांगितले होते. पण चित्रपट पाहताना हे जाणवत नाही.
2016 मध्ये 'थेरी'ने ज्या चुका केल्या होत्या त्याच चुकांची पुनरावृत्ती 'बेबी जॉन मध्ये पाहायला मिळतेय. त्याशिवाय रिमेक चित्रपटांबाबतही प्रेक्षकांमध्ये नकारात्मक भावना आहे. थेरीच हिंदी डब व्हर्जन इंटरनेटवर उपलब्ध आहेत. अशा स्थितीत पुन्हा तोच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात का जावे, असे लोकांचे मत आहे.
'बेबी जॉन' बद्दल बोलायचे झाले तर कॅलिसने याचे दिग्दर्शन केले आहे. ऍटली या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी काम केले आहे.
मूळ चित्रपटापेक्षाही कमी कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'थेरी'ने फक्त तामिळ भाषेमध्ये 13.1 कोटी रुपये कमावले होते. ऍटली दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र याच चित्रपटाचा रिमेक असलेला बेबी जॉन हा समाधानकारक कमाई करण्यात अपयशी ठरल्याच स्पष्ट झालय.
'बेबी जॉन'ला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद
वरुण धवन व्यतिरिक्त कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव देखील मुख्य भूमिकेत आहेत आणि क्लायमॅक्सनंतरच्या सीनमध्ये सलमान खानचा खास कॅमिओ आहे. ॲटलीच्या 2016 च्या तमिळ हिट थेरीचा रिमेक असलेल्या बेबी जॉनला प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा मिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही प्रेक्षकांनी वरुणच्या अभिनयाची, कथानकाची आणि ॲक्शन सेट्सची प्रशंसा केली आहे, तर काही लोकांनी चित्रपटाने सपशेल नाराज केल्याचे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications