2026मध्ये बॉक्स ऑफिसवर 'तिरंगा' फडकणार! 'बॉर्डर 2' सह 4 मोठे चित्रपट शौर्याची गाथा सांगण्यासाठी सज्ज
Bollywood Movies 2026 Border 2 Battle of Galwan : २०२५ हे वर्ष आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर असून अवघ्या काही तासांतच आपण २०२६ मध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच, बॉलीवूडनेही २०२६ हे वर्ष 'देशभक्ती'च्या नावे करण्याचे ठरवले आहे. येणाऱ्या वर्षात केवळ मनोरंजनच नाही, तर भारतीय सैनिकांचे शौर्य, बलिदान आणि राष्ट्रप्रेमाचा जोश पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' पासून सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' पर्यंत, २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर देशभक्तीचा महाकुंभ भरणार आहे.

२०२६ मधील ४ मोठे देशभक्तीपर चित्रपट
१. इक्कीस (Release: १ जानेवारी २०२६)
वर्षाची सुरुवातच एका वीरगाथेने होणार आहे. 'इक्कीस' हा चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे.
विशेषता काय? :
या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया पदार्पण करत आहेत. यात धर्मेंद्र यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
२. बॉर्डर २ (Release: २३ जानेवारी २०२६)
१९९७ च्या ऐतिहासिक 'बॉर्डर'चा सीक्वेल अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होईल.
स्टारकास्ट कोण?:
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी. या मल्टीस्टारर चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
३. धुरंधर २ (Release: १९ मार्च २०२६ - ईद)
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता अधिक मोठ्या स्तरावर ही कथा मांडली जाणार आहे.
४. बॅटल ऑफ गलवान (Release: १७ एप्रिल २०२६)
भारत-चीन दरम्यान झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुख्य भूमिकेत कोण?:
यात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाच्या टीझरने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.












Click it and Unblock the Notifications