दीपिका-रणवीरचा 100 कोटींचा आलिशान नवीन बंगला; दुआसाठी खास घर, पहिली झलक व्हायरल!
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. हे जोडपे लवकरच आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण 8 सप्टेंबर रोजी दोघेही पालक झाले आहेत. त्यांनी छोटी परी 'दुआ पदुकोण सिंग' जन्माला दिला आहे. या दोघांनी आपल्या मुलीसाठी मुंबईतील सर्वात प्रीमियम भागात एक आलिशान नवीन घर खरेदी केले आहे, ज्याची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण दुआसह नवीन आलिशान घरात लवकरच शिफ्ट होणार आहेत. हे घर मुंबईतील बांद्रा परिसरात आहे. या घराची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांचे शेजारी हे घर आहे.

कसं आहे दीपिका आणि रणवीर यांचे नवीन घर
दीपिका आणि रणवीर यांचे नवीन घर हे बांद्रा बँडस्टँड परिसरात आहे, जे समुद्राकडे असलेले एक आलिशान क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंट आहे. हे घर 11,266 चौ फूट आतील जागा आणि 1,300 चौ. फूट टेरेस जागेवर आहे. ज्यामुळे ते 16 व्या ते19 व्या मजल्यांवर पसरलेले आहे. या घरासाठी 100 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला असून त्याचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचे खास दृश्य पाहायला मिळते. हे घर बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घरांपैकी एक बनले आहे. रिपोर्टनुसार, घराचे इंटिरिअर डिझाइन मॉडर्न आणि क्लासी आहे.
या घराच्या टेरेसवर मुलांना खेळण्यासाठी जागा तसेच कुटुंबासाठी रिलॅक्स होण्यासाठी खास डिझाइन केले आहे. रिपोर्टनुसार हे घर दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या मुली दुआसाठी खास बनवले आहे. घरात अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, स्मार्ट होम तंत्रज्ञान आणि पर्यावरणस्नेही वैशिष्ट्ये समाविष्ट केली गेली आहेत, ज्यामुळे ते आधुनिक जीवनशैलीसाठी योग्य ठरते.
शाहरुख आणि सलमान यांचे नवीन शेजारी
या घराचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जवळ आहे. बांद्रा बँडस्टँड परिसर हा सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध आहे आणि आता दीपिका-रणवीर आपल्या मुलीसह या नवीन घरात लवकरचं शिफ्ट होणार आहेत. शाहरुख खानचे मन्नत हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिध्द असं हे घर आहे तर सलमान खानचे गॅलेक्सी अपार्टमेंट हे त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
दुआसाठी खास तयारी
दीपिका आणि रणवीर यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या मुली दुआचा जन्म दिला आहे. दुआसाठी एक खास खोली तयार केली आहे, जी रंगीबेरंगी आणि मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने डिझाइन केली गेली आहे. या घरात घरात मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, मुलांसाठी सुरक्षित रेलिंग आणि हवेशीर खोलींचा समावेश आहे. दुआची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ती पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.
रणवीर- दीपिकाचे आगामी प्रॉजेक्ट
रणवीर सध्या फरहान अख्तरच्या 'डॉन 3' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तो शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर डॉनची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर त्याचा 'धुरंधर' हा चित्रपटही येणार आहे, ज्यामध्ये अक्षय खन्ना दिसणार आहेत. दीपिका सध्या आईची भूमिका पार पडत असली तरी ती लवकरच शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात दोघे एकत्र झळकले होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. दीपिका आई बनल्यानंतरही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.












Click it and Unblock the Notifications