Box Office Collection: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'मेरे हसबंड की बीवी'फ्लॉप
Box Office Collection: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नव-नवीन विक्रम मोडत आहे. सोशल मीडियावरही चाहते याला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. दुसरीकडे अर्जुन कपूरचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपटही चर्चेत आहे.
छावा रिलीज होऊन 12 दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आपला आलेख कायम ठेवला आहे. पण जर आपण मेरे हसबंड की बीवीबद्दल बोललो तर हा चित्रपट रिलीजच्या 5 व्या दिवशी काही खास कामगिरी करू शकला नाही. मंगळवारी दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

रिपोर्ट्सनुसार, छावा चित्रपटाने 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 18 कोटी रुपये कमावले आहेत. यानुसार चित्रपटाने आतापर्यंत 363.25 कोटी रुपये कमावले आहेत. छावा चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आता 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काळात जर चित्रपटाची कमाई अशीच राहिली तर 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होईल.
अर्जून कपूरचा 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप
जर आपण अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पाचव्या दिवसापर्यंत फक्त 5 कोटी रुपये कमवू शकला आहे. तर पहिल्या या चित्रपटाने दिवशी 1.50 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 1.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 1.11 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 51 लाख रुपयांचा व्यवसाय झाला. या आकडेवारीनुसार सुरुवातीच्या काळात चित्रपटाला त्याचा खर्च सुध्दया वसूल करता येत नाही.
या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की विकी कौशलच्या 'छावा'ने चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. आशा आहे की हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बराच काळ टिकेल. दरम्यान अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाची कमाई ज्या पद्धतीने सतत कमी होत आहे ते पाहता, चित्रपटाला टिकून राहणे कठीण होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications