Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्या बद्दल पोलिसांनी दिली महत्वाची माहीती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पश्चात मलायका, अमृता आणि त्यांची आई जॉयस पॉलीकार्प असा त्यांचा परिवार आहे.

"अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं आहे," एएनआयने बुधवारी मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ट्विट केले आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी राज टिळक रोशन म्हणाले, "अनिल अरोरा यांचा मृतदेह सापडला आहे. ते सहाव्या मजल्यावर राहत होते. आम्ही अधिक तपास करत आहोत आणि आमची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. आम्ही सर्व बाजूंनी सविस्तर तपास करत आहोत. आमचे पथक इथे पोहोचले आहेत. इथे फॉरेन्सिक टीम्सही आहेत...आम्ही सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करत आहोत...प्राथमिकदृष्टया ही आत्महत्या असल्याचं दिसतंय, असं पोलिसांनी सांगितले आहे.

malaika arora father death

दरम्यान एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "मलायकाच्या वडिलांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे, हे खरे आहे.त्यांनी आत्महत्या केलेली नाही, हा अपघात होता. त्याला कोणताही आजार किंवा अशी कोणतीही समस्या नसल्याने ते सर्वजण शॉकमध्ये आहेत." पोलिसांच्या पंचनामातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे सूत्राने सांगितले.

अरबाज खान हा मलायकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचला आहे. अभिनेता-निर्माता अरबाज खान हा मलायकाचा पूर्वीचा पती आहे, या वृत्तांदरम्यान मलायकाच्या कुटुंबीयांच्या घरी पोहोचला आहे. अपार्टमेंटबाहेर पोलिस कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी दिसत होते.

अनिल अरोरा होते नेव्हीमध्ये नोकरीला

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका सांगितले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+