बॉलिवूड पार्ट्यांमध्ये काय होतं? कंगना राणावतने केला मोठा खुलासा
Kangana Ranaut On Bollywood Parties: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाने सतत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता अलीकडेच तिने सांगितले की, ती बॉलिवूड पार्ट्यांना का जात नाही. राज शामानीसोबतच्या संवादात कंगना रणावतने पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.
जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिचे बॉलिवूडमध्ये कोणी मित्र आहेत का? यावर कंगनाने उत्तर दिले की, 'मी बॉलीवूडच्या लोकांसोबत मैत्री करु शकत नाही. बॉलीवूडची माणसं स्वत:मध्ये गुंतलेले आहेत. कंगना राणावतने पुढे बॉलिवूडच्या लोकांना इडियट्स म्हटलं आहे.
तिने पुढे सेलिब्रेटींच्या दैनंदिन दिनचर्याबाबत खुलासा केला आहे. 'जर हे लोक शूटिंग करत नसतील तर त्यांचा दिनक्रम असा असतो की, ते सकाळी उठतात, काही फिजिकल ट्रेनिंग करतात, दुपारी झोपतात, मग उठतात आणि मग जिमला जातात. यानंतर ते पुन्हा झोपतात आणि नंतर टीव्ही पाहतात. या लोकांच्या डोक्यात काही नाही. अशा लोकांना तुम्ही तुमचे मित्र कसे बनवू शकता? काय चालले आहे याची कल्पना त्यांना नाही.

कंगना राणावतने बॉलिवूड सेलिब्रिटी आपापसात काय बोलतात याबाबत ही खुलासा केला आहे. 'त्या लोकांमध्ये काही कामाबद्दल महत्वाची चर्चा होत नाही. जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा ते ड्रिंक करतात आणि कपड्यांबद्दल आणि एक्सेसरीज बद्दल बोलतात. ते जे बोलतात ते लज्जास्पद आहे. हा आघात आहे. बॉलीवूड पार्ट्या माझ्यासाठी ट्रॉमासारख्या आहेत.
कंगना राणावतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तिचा इमर्जन्सी हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अनुपमा खेर, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.












Click it and Unblock the Notifications