Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट, घ्या जाणून

Sonu Sood Wife Sonali Health Update: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली सूद हे सध्या चर्चेत आहेत. 24 मार्च 2025 रोजी मुंबई-नागपूर महामार्गावर अभिनेत्याची पत्नी सोनाली सूद हिचा भीषण कार अपघात झाला होता.

या अपघातात सोनू सूदची पत्नी सोनाली सूद आणि त्याची मेहुणी व पुतण्या देखील गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाची प्रकृतीही गंभीर आहे. सोनू सूदची पत्नी सोनाली आणि ड्रायव्हर दोघेही नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

sonu sood  wife sonali health update

सोनू सूदने पत्नीच्या प्रकृतीची माहिती दिली

सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वर त्याच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते आणि आम्हाला ती पुन्हा एकदा जाणवली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि मनापासूनच्या संदेशांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. सोनाली आणि कुटुंबातील दोन सदस्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. तुमच्या प्रेम आणि दयाळूपणाबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. सोनू सूद आणि कुटुंब.

नागपूर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली सूद आणि तिच्या बहिणीला अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ते अजूनही डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. 24 मार्च 2025 रोजी रात्री 10.30 वाजता सोनाली आणि तिच्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात

सोनाली सूद आणि कार चालक यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर सोनाली सूदची कार एका ट्रकला धडकली होती. या भीषण अपघातात कार चक्काचूर झाली आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कार अपघातानंतर चारही जणांना नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले.

रुग्णालयाने दिले हेल्थ अपडेट

रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चारही जणांना अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने त्यांना कोणत्याही अंतर्गत दुखापती झाल्या नाहीत. सोनू सूदच्या पुतण्याला प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोनाली सूद, तिची बहीण आणि ड्रायव्हर डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. त्याची प्रकृती सुधारत असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+