Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'काश्मीर स्वर्गाऐवजी नरक...' पहलगाम दहशतवादी हल्यावर सलमान खानची भावनिक पोस्ट

Salman Khan on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून बॉलिवूड अभिनेता सलमान खानने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

salman khan

सलमानने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, "काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग सारखी जमीन नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. एकाही निष्पापाला मारणे म्हणजे संपूर्ण विश्वाचा नाश करणे आहे." सलमानच्या या विधानाला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड पाठिंबा दिला आहे.

बॉलिवूडमधून अनेक कलाकरांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही या हल्ल्याचा निषेध करताना म्हटलं आहे की, "पहलगाममधील या क्रूर आणि अमानवीय हिंसाचारामुळे मला खूप दुख आणि संताप झाला आहे. अशा वेळी आपण फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी संवेदना व्यक्त करू शकतो. आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र उभे राहिले पाहिजे."

अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले, "पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला. निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारणे म्हणजे पूर्णपणे अमानवीय आहे. त्यांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना." अभिनेता संजय दत्तनेही संताप व्यक्त करताना म्हटले, "त्यांनी आमच्या लोकांना मारले आहे. हे माफ करता येणार नाही, या आतंकवाद्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे."

जाह्नवी कपूरने इन्स्टाग्रामवर लिहिले, "पहलगाम हल्ल्यात निष्पापांचे जीव गेले, यामुळे मी हादरून गेले आहे. ही कृत्ये भ्याड आणि अमानवीय आहेत. मी न्यायासाठी प्रार्थना करते, पण मला भीती वाटते की या वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेला संताप शांत होणार नाही." विकी कौशल, हिना खान, सिद्धार्थ मल्होत्रा, मोहनलाल आणि कमल हसन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+