सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, 2 कोटींची केली मागणी
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासोबतच दोन कोटी रुपयांची मागणी ही केली आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांना एक मेसेज पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये पैसे न दिल्यास सलमान खानला जीवे मारण्यात येईल, असं म्हटले आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंगळवारी 20 वर्षीय तरुणाला नोएडा येथून अटक केली आहे. या तरुणाला सलमान खान आणि झीशान सिद्दीकी यांना धमकीचे कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीचे नाव मोहम्मद तय्यब, गुरफान खान असे आहे. त्याला नोएडा सेक्टर 39 येथून अटक करण्यात आली आहे.
12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे बिश्नोई गँगचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications