सैफ अली खानच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी, आता पोलिस देणार अशी सुरक्षा
saif ali khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. या अपघातात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या एक सर्जरी करण्यात आली.
पाच दिवसानंतर बुधवारी (ता.21 )जानेवारी रोजी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो आता घरी परतला आहे. दरम्यान सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता त्याला सुरक्षा पुरवल्याची वृत्त येत आहे. सैफसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे.

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय
सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षा
- मीडिया रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यानंतर त्याचे कुटुंब खूप घाबरले होते. अशा परिस्थितीत सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे.
-सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना सुरक्षेसाठी किती पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत हे उघड करण्यात आलेले नाही.
याशिवाय सुरक्षा श्रेणी देखील माध्यमांना सांगण्यात आलेली नाही. अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला कोणत्या श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे - X, Y किंवा Z - याची माहिती उघड केलेली नाही.
रोनित रॉयची खाजगी सुरक्षा
- सैफ अली खान लीलावती रुग्णालयात 5 दिवस राहिल्यानंतर 21 जानेवारी 2025 रोजी घरी परतला. घरी येताच अभिनेत्याने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
-रोनित रॉय यांची स्वतःची खाजगी सुरक्षा एजन्सी आहे ज्याचे नाव एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन आहे. तर सैफ अली खानने रोनित रॉयच्या खाजगी सुरक्षेतून एक खाजगी अंगरक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications