मोठी बातमी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु
मुंबई : बॉलिवूड क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. सैफ यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या एका चोराने सैफवर चाकू हल्ला केला आहे. मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात एक चोर घुसला होता. त्यावेळी चोराने सैफवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
An unknown person entered Actor Saif Ali Khan’s residence and argued with his maid, late last night. When the actor tried to intervene and pacify the man, he attacked Saif Ali Khan and injured him. Police are investigating the matter: Mumbai Police
— ANI (@ANI) January 16, 2025
(file photo) pic.twitter.com/pHgByuxqB9
चोराने सैफवर मध्यरात्री 6 वार केले असल्याची माहिती मिळत आहे. सध्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर सर्जरी केली जात असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप खान कुटुंबियांकडूनही कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान मुंबई पोलिस सध्या सैफ अली खानच्या दाखल झाले असून घरातील नोकर आणि वॉचमनची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सैफच्या घर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. तसेच घरातील नोकरांचे मोबाईल ही जप्त करण्यात आले आहेत. चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications