रितेश देशमुखने छोटा पुढारीला फैलावर घेतले, घन:श्यामच्या डोळ्यांत आलं पाणी

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. काल चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर रितेशने बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना चांगलेच फैलावर घेतले. उद्धट वर्तनामुळे जान्हवीला रितेशने जेलमध्ये टाकले. याशिवाय अरबाज, वैभव निक्कीलाही चांगलेच खडसावले. पण या सगळ्यापेंक्षा एका वेगळी घटना काल बिग बाॅसच्या घरात घडली, रितेश देशमुखने काल छोटा पुढारीला चांगलंच झापलं आहे. त्यामुळे घनःश्याम चांगलाच बिथरला होता. चला तर मग जाणून घेऊया रितेशने छोटा पुढारी घनशामला का झापले?

घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारीबद्दल रितेश सुरुवातीला म्हणाला की, बिग बाॅसच्या या घरात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा आवाज दाबला जातोय." पुढे मग रितेशने छोटा पुढारीसाठी एक टास्क तयार केला होता. यात घनःश्यामला नावांचे बॅज सदस्यांना लावायचे होते.

Ghanshyam Darwade

'माचिस', 'नागीन' अशी विशेषणांची चिन्हं घनःश्यामने पॅडी, धनंजय आणि अंकिता यांना दिली. पुढे जेव्हा 'चावी' हा बॅज लावायची वेळ आली तेव्हा घनःश्याम म्हणाला, गोंधळला आणि हे "अवघड आहे" असं म्हणाला. हे ऐकून रितेश त्याचावर चांगलाच भडकला. "बॅज लावताय की घराबाहेर येताय. एकाला जेलमध्ये टाकलंच आहे. गेल्या आठवड्यात डबल एविक्शन झालं होतं. या आठवड्यातही मी ते करु शकतो." असा सज्जड दम जणू रितेशने घन: श्याम दरवडेला दिला.

रितेश घनःश्यामला म्हणाला तुमच्यासाठी हा स्पेशल टास्क ठेवलाय. तो तुम्ही करायला नकार देताय. मी तुम्हाला एक संधी देतो. मी तुम्हाला नॉमिनेट करणार नाही पण इथून पुढे मी तुमच्याशी बोलणार नाही. तुमचा गेम, टास्क आता संपला आहे. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका. तुमची सर्व नाटकं आता बंद." रितेशचा रुद्रावतार बघताच घनःश्यामच्या डोळ्यातून पाणी आलं. "मला माफ करा सर. मला शिक्षा देऊ नका. बाहेर काढू नका. इथून पुढे असं नाही होणार असं तो हात जोडत म्हणाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+