आई मरी माता, बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता

मुंबई - आई मरी माता, बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका, झापूक-झुपूक फेम सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण ठरला आहे. अभिजीत सावंतने दुसरा क्रमांक पटकवला. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीची ट्रॉफी, 14 लाख 60 हजार रुपये ऱोख रक्कम, पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि तुनवाल ई मोटर्स लिमिटेड तर्फे बाईक देण्यात आली आहे.'बिग बॉस मराठी सीजन 5'चा ग्रॅड फिनाले सोहळा आज पडला. त्यावेळी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश भाऊने विजेत्याची घोषणा केली.

बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या सीझनची प्रचंड क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. मागील 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरातला खेळ आज अखेर संपला. आई मरी माता, झापूक-झूपूक, बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनचा विजेता ठरला आहे. या सीझनमध्ये सुरुवातीला बीग बॉसच्या घरात 16 सदस्याचं आगमन झालं होतं. मात्र खेळाअंती एक-एक करुन खेळाडू टास्कमधून बाहेर पडले. या वर्षींच्या सीझनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.

suraj chavan

महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरघरात हा सीझन प्रचंड लोकप्रिय झाला होता. बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. सोशल मिडीयावर बिग बॉसमधील डायलॉंगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सुरज चव्हाणचा गुलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ,झापूक-झुपक तर निक्कीचा बाई हा काय प्रकार या डायलॉंग चांगलेच गाजले.

महाराष्टाचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने या संपूर्ण सीझनचे होस्ट आपल्या खास स्टाईलने केले. मागील 70 दिवसांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ग्रॅड फिनालेच्या कार्यक्रमात करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील टॉप 6 फायनलिस्ट निकी तांबोळी,अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर,जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार हे स्पर्धक पोहोचले होते. मात्र अखेर गुलीगत धोका, झापुक-झुपूक फेम सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी सीजन 5' चा विजेता ठरला. सूरजच्या नावाची घोषणा होताचा त्यांच्यावर सोशल मिडीयावर कौतुकांच्या वर्षाव केला होतोय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+