अगं बाब्वोव..! बीग बाँसच्या विजेत्याला मिळणार 'एवढे' पैसे; कोण ठरेल भाग्यवान?
Bigg Boss marathi Season- 5 : बिग बॉस मराठीचा सध्या पाचवा सीझन सुरु आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे. या पाचव्या सीझनच्या ग्रॅड फिनालेला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. बिग बॉसने अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर असे सहा फायनलिस्ट जाहीर केले असून आज यापैकी एका सदस्याला घरचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यानंतर टॉप- 5 सदस्य थेट फायनलमध्ये जातील. आता बिग बॉसचा हा सीझन जिंकणाऱ्या सदस्याला नेमके किती बक्षीस रक्कम मिळतील..? हा प्रश्न अनेकांना पडतोय. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहू...
वर्षा उसगावकर पडल्या घराबाहेर
बिग बॉसच्या घरात गुरूवारी मिडविक इविक्शन पार पडलं. निक्की तांबोळी ही 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती नॉमिनेशनपासून वाचली. उर्वरीत अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर या सहा सदस्यांमध्ये हा खेळ रंगला. त्यापैकी वर्षा उसगांवकर यांना घराबाहेर पडावं लागलं. टॉप-5 स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडवीक एविक्शन पार पडलं.

अंकिता आणि वर्षा बॉटम - 2 स्पर्धक होत्या. शेवटी बिग बॉसने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगांवकरांचा घरातील प्रवास 67 दिवसांनी संपला. अशाप्रकारे वंडर गर्ल वर्षा उसगांवकर यांनी घराचा निरोप घेतला.
असे आले बिग बॉसचे सहा फायनलीस्ट
निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली होती. निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजीत सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला. अभिजीत नंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवारने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. धनंजय यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली. तर पाचव्या क्रमांकावर सूरज चव्हाण याने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली होती.
विजेत्याला किती मिळणार पैसे?
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जिंकणाऱ्या सदस्याला ट्रॉफी आणि 25 लाख रूपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. सध्या विजेता म्हणून अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी या सदस्यांची नावे चर्चेत आहेत. या सदस्यांपैकी एक सदस्य आता विजेता ठरणार आहे. हा सदस्य कोण असणार आहे, हे आपल्याला 6 ऑक्टोबरला कळणार आहे.












Click it and Unblock the Notifications