Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पॅडी दादा मानलं राव..! बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडताना पंढरीनाथ कांबळेंनी घेतला हा मोठा निर्णय

Bigg Boss Marathi : मुन्नाभाई एसएससी या चित्रपटापासून खबरदारपर्यंत उत्तम अभिनय साकारणारा हुरहुन्नरी कलाकार पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी आता बिग बाॅसच्या घरात दिसणार नाही. या घरातून काल तो एलिमिनेट झाला. पण जाता जाता त्यानं जो निर्णय घेतला तो त्याचं मन किती मोठ्ठं आहे हे दाखवणारा होता. विशेष म्हणजे त्याची ही बांधिलकी लोकांना खुपच भावली.

'बिग बॉस मराठी'च्या घराचा पंढरीनाथ कांबळेने कमी मतं मिळाल्याने नवव्या आठवड्यात निरोप घेतला आहे. तब्बल 62 दिवस पॅडी कांबळे याने आपला खेळ दाखवला. या काळात त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी अत्यंत सौज्वळ व्यवहार केला. तसं पाहीलं तर बिग बॉसचं घर साधसुधं नाही. तिथं सौज्वळपणा फार कमी पाहण्यात येतो पण जेव्हा एखादा सदस्य असा गुण घेऊन खेळतो तर त्याला याचा फटका बसतो तर प्रेक्षकांकडून मात्र वाहवा मिळते. पॅडीच्या बाबतीत अगदी तसंच झालं असं काहीअंशी म्हणावं लागेल.

Bigg Boss Marathi Pandharinath Kamble s big decision

पॅडी ग्रँड फिनालेच्या शर्यतीत टॉप-पाच मध्ये दिसेल असा अंदाज त्याच्या चाहत्यांसह 'बिग बॉस मराठी'च्या काही प्रेक्षकांनी वर्तवला होता. एवढचं काय तर पॅडीचीही हीच इच्छा होती की, ग्रँड फिनालेच्या शर्यतीत आपण राहावं मात्र, सर्वच मनासारखं होतं असं कधी होतंच असंही नाही. त्यामुळं यावेळी मतांच्या स्पर्धेत पंढरीनाथ कमी पडला आणि नवव्या आठवड्यात त्याचं एलिमिनेशन झालं.

अन् संधी हुकली...

कालच्या एपिसोडमध्ये पॅडीसोबतच एलिमेनेशन राऊंडमध्ये डीपी दादा, जान्हवी किल्लेकरसह अंकिताही होती. जेव्हा प्रकाशझोतात तिघांवर टाकण्यात आला तेव्हा जानवी आणि अंकिता आणि डीपी दादा हे सुरक्षित राहीले पण पॅडीवर प्रकाशझोत नव्हता याचा अर्थ तो आता या बिग बॉसच्या घरात राहणार नाही हे स्पष्ट झालं.

जाता जाता काय म्हणाला पॅडी

पंढरीनाथ कांबळे याचं जेव्हा एलिमेनेशन झालं तेव्हा तो एखाद्या निडर योध्यासारखा लढला. त्याच्या डोळ्यात अश्रू तर दिसलेच नाही पण जेही आपल्या वाट्याला मिळालं त्यात समाधान मानून त्याने घराचा निरोप घेतला. जाण्यापुर्वी घरातील प्रत्येक सदस्याला तो अलिंगन देत भेटला तेव्हा त्याने काय कमावलं हे सर्वांनाच दिसून आलं. सुरज तर त्याला बिलगूनच राहीला त्याला पॅडी दादा निरोप घेणार याचं फारच दुःख झालं. पण त्याला पॅडी दादानं समजावलं.

मी सुरजचं..

घरात पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला खंबीरपणे साथ दिली. शिक्षण पूर्ण झालं नसल्याने सूरजला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे अनेकदा टास्क समजून घेण्यात सूरजला अडचण निर्माण व्हायची. अशावेळी पंढरीनाथने पुढाकार घेऊन त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. एवढंच नव्हे तर घराबाहेर गेल्यावर सुद्धा सूरजची साथ सोडणार नाही असं पॅडीने यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. घराचा निरोप घेताना पॅडी दादानं एकच सांगितलं की, मी सुरजचं पालकत्व घेतो. हा निर्णय ऐकून सर्वांना आनंद झाला आणि पंढरीनाथ कांबळेच्या मनाचा मोठेपणाही दिसून आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+