Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सृजना-विवेकची लव्हस्टोरी; नेपाळपासून अमेरिकेपर्यंत अमर राहिलेली अधूरी प्रेमकहाणी

हिर-रांझा असो, नाहीतर सोनी-महीवाल... वाचलेल्या प्रेमकहाण्यांपेक्षा सृजना-विवेकची वास्तवातील प्रेमकहाणी प्रेमाची खरी व्याख्या सांगून जाते. नेपाळी इन्फ्लुएन्सर सृजना सुबेदी आणि विवेक पंगेनी यांची प्रेमकहाणीही अशीच आहे, जी आता कायमची अमर झाली आहे. कशी होती ही प्रेमकहाणी..? अर्ध्यावरती ती कशी थांबली..? ती अजरामर कशी झाली..? ते आपण पाहूयात...

Bibek Pangeni

कोण होते हे जोडपे

सोशल मिडिया स्टार विवेक पंगोनी व त्याची पत्नी सृजना सुबेदी हे मुळचे नेपाळचे. मात्र ते नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. या दोघांचं नातं कधी सुरु झालं, हे सृजनाने एका पोस्टमध्ये सांगितलं होतं. तिने सांगितले आहे की, ते दहा वर्षांपूर्वी भेटले होते. विवेक हा सृजनाचा शाळेत सिनियर होता. 6 वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर त्यांनी लग्न केले. यानंतर ते अमेरिकेत आले आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली.

विवेकला कॅन्सर

या दोघांचे आयुष्य आनंदात सुरु असतानाच विवेकचा ब्रेन कॅन्सर झाल्याचे समजले. त्यावेळी तो कँन्सर स्टेज-1 मध्ये होता. तेव्हापासून सृजना त्याच्यासोबत ढाल बनून राहिली. या दाम्पत्याने कॅन्सरला हरवण्याचा निर्धार केला. मात्र शेवटी कॅन्सरचा विजय झाला. 19 डिसेंबरला विवेक आणि सृजना कायमचे वेगळे झाले. पण या काळात या दोघांनीही लग्न, प्रेम आणि सहवास या त्रिसुत्रीचा खरा अर्थ जगाला समजावला. दोघेही सोशल मीडियावर अँक्टीव्ह असल्याने त्यांच्या आयुष्यात काय सुरु होते, ते रोज समजायचे.

आनंदाचे क्षण व्हायरल

विवेक आजारी असतानाही दोघांनीही आनंदाचे क्षण खुलेआम साजरे केले. ऑगस्टमध्ये सृजनाने विवेकच्या 32व्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. नवऱ्याचा वाढदिवस खास बनवला होता. विवेकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. कॅन्सरशी लढाई, आयुष्यातील चढ-उतार आणि कठीण दिवस पत्नी सृजनाने काही व्हिडिओमध्ये दाखवून दिले होते. जे तिच्या चाहत्यांसाठीच काय पण पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हृदय पिळवटून टाकणारे ठरत आहेत.

सृजनाची शेवटपर्यंत लढाई

कॅन्सरशी लढण्यासोबतच सृजना प्रत्येक पावलावर विवेकच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्यासाठी केस काढणे असो किंवा त्यांची सर्व कामे मी करणे असो, सृजनाने त्याच्यावरील खरे प्रेम प्रत्येक कृतीतून दाखवले. विवेकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी श्रीजनाची अवस्था वाईट होती, रडत होती. तिला पाहून सर्वांचे डोळे पाणावले. त्यांची प्रेमकथा खरोखरच निष्ठा आणि समर्पणाचे उदाहरण आहे. त्यामुळेच विवेक-सृजना सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+