सेलिब्रिटी क्रिकेट लीग २०२५- बंगाल टायगर्सचा १२ धावांनी विजय; वाचा, कसा रंगला सामना
सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये आज पहिला सामना गतविजेच्या बंगाल टायगर्स व चेन्नई रायनोजमध्ये रंगला. या सामन्यात बंगाल टायगर्सने १३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. सेलिब्रिटी क्रिकेट लीग २०२५ च्या ११ व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे.

कसा झाला आजचा सामना
सेलिब्रिटी क्रिकेट लीग- २०२५ ही स्पर्धा जानेवारीमध्ये सुरू होणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आज ८ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु झाली असून ती २ मार्चपर्यंत चालणार आहे. आज पहिला सामना बंगाल टायगर्स विरुद्ध चेन्नई रायनोज यांच्यात रंगला. या सामन्यात बंगाल टायगर्सने चांगली कामगिरी केली. सुरुवातीला टायगर्स संघर्ष करताना दिसत होते. त्यांना अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. परंतु कमी धावसंख्येतही बंगालच्या गोलंदाजांनी आपली प्रतिभा दाखवली. बंगालने चेन्नईला १०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रायनोजने त्यांच्या पहिल्या डावात ११ धावांची आघाडी घेतली होती, परंतु शेवटी, टायगर्सला ते पूर्ण करता आले नाही. त्यांनी रायनोजचा १२ धावांनी पराभव केला. यांना ८८ धावांपर्यंत मजल मारता आली. या स्पर्धेत १०-१० षटकांचे दोन डाव खेळले गेले.
कशी राहीली अंतिम धावसंख्या
- बंगाल यगर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
- बंगालने सामना १३ धावांनी जिंकला.
- चेन्नई रायनोज: चौथ्या डावाच्या शेवटी ८८/५
- बंगाल टायगर्स: तिसऱ्या डावाच्या शेवटी १११/४
- चेन्नई रायनोज: दुसऱ्या डावाच्या शेवटी ९०/४
- बंगाल टायगर्स: पहिल्या डावाच्या शेवटी ७९/५
१७ सामन्यांची आहे स्पर्धा
या स्पर्धेत एकूण आठ संघ १७ सामने खेळणार आहेत. हे सर्व सामने बेंगळुरु, दिल्ली, हैदराबाद, कटक आणि सुरत येथे होणार आहेत. मुंबई हिरोजच्या संघात रितेश देशमुख (कर्णधार), बॉबी देओल, सुनील शेट्टी, वरुण बडोला, आफताब शिवदासानी, समीर कोचर, इंद्रनील सेनगुप्ता, अपूर्व लाखिया, कबीर सदानंद, कुणाल खेमू, राजा भेरवानी, शब्बीर अहलुवालिया, शरद केळकर, सोहेल खान, साकिब सलीम, तुषार जलोटा, वत्सल सेठ, साहिल चौधरी हे खेळाडू आहेत.
चेन्नई रायनोज संघ- आर्य अशोक सेल्वन (कर्णधार), भरत, शाम, बोस वेंकट, हेमचंद्रन, कलैयारसन, महेंद्रन, नंदा, पृथ्वी, रमणा, संजय भारती, शांतनु, शरण, उदय कुमार, विक्रांत, विष्णू.
बंगाल टायगर्स संघ- जिशु सेनगुप्ता (कर्णधार), इंद्राशीष, मोहन, सुमन, जॉय, जो, युसूफ, जीतू कमल, जेमी, रत्नदीप घोष, आनंद चौधरी, सँडी, आदित्य रॉय बॅनर्जी, अरमान अहमद, मँटी, राहुल मजुमदार, गौरव चक्रवर्ती, बोनी, सौरव दास.












Click it and Unblock the Notifications