Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाआधी कुटूंब आले एकत्र ! विरोध तक्रारी संपल्या, फोटो व्हायरल

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. दोघे 23 जूनला लग्न करणार आहेत. पण या दरम्यान, सोनाक्षीच्या कुटुंबीय लग्नाला विरोध करत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. मात्र, आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding

गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, सोनाक्षी सिन्हा दुसऱ्या धर्मात लग्न करण्याच्या निर्णयावर तिचे कुटुंबीय खूश नाहीत. तसंच तिचे कुटूंब लग्नालाही येणार नाही. मात्र आता या बातम्यांत काही तथ्य नाही. लग्नाच्या दोन दिवस आधी सोनाक्षी आणि झहीरचा त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

या फोटोत संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे. फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा पहिल्यांदाच त्यांचा भावी जावई झहीरसोबत दिसले. फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा समोरून पांढऱ्या ड्रेसमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. फोटोची खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच सिन्हा फॅमिलीसोबत इक्बालची फॅमिलीही दिसली होती.

हा फोटो शेअर करताना 'मॅड हाउस' असे कॅप्शन दिले आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बरं, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचे कुटुंब या नात्यावर खूश असल्याचे या फोटोवरून स्पष्ट झाले आहे. आता या जोडप्याला वधू-वराच्या रुपात पाहण्याची प्रतीक्षा चाहते करत आहेत.

झूमशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित न राहण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, "मला सांगा, हे कोणाचे आयुष्य आहे? हे माझ्या एकुलत्या एक मुलीचे, सोनाक्षीचे आयुष्य आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. मी नक्कीच लग्नाला उपस्थितीत राहणार आहे. ती माझी मुलगी आहे, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+