Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Baaghi 4 Box Office Collection : 'बागी 4' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 2 दिवसांत 'एवढी' केली दमदार कमाई!

Baaghi 4 Box Office Collection : अभिनेता टायगर श्रॉफचा बहुचर्चित चित्रपट 'बागी ४' हा दोन दिवसांपुर्वी शुक्रवारी ५ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. सध्या तो या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक ए. हर्षा आणि निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या या ॲक्शन थ्रिलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून हा चित्रपट रसिकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाल केली असून आपला कमाईचा जलवाही दाखवला आहे.

Baaghi 4 Box Office Collection

बागी सिनेमापुर्वी तीन सिनेमे येऊन गेले आहेत, हा या सिनेमाचा चौथा भाग आहे, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट यशस्वी होईल असे मानले जात आहे. संजय दत्त आणि टायगर श्राॅफ हे या सिनेमाचे खास आकर्षण आहे.

Take a Poll

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, 'बागी ४' ने पहिल्या दिवशी (शुक्रवार) १२ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी (शनिवार) कमाईत २५% घट झाली असली तरी, चित्रपटाने ९ कोटी रुपये कमावले. यामुळे, चित्रपटाची एकूण कमाई दोन दिवसांत २१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

टायगर श्रॉफसोबतच, चित्रपटात सोनम बाजवा आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात माजी सौंदर्यवती हरनाज संधूने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. संजय दत्तने खलनायकाची भूमिका या चित्रपटात साकारली असून, टायगर श्राॅफ आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे.

बागी ३ ने किती केली होती दुसऱ्या दिवशी कमाई?

कमाईच्या बाबतीत 'बागी ४' ची तुलना 'बागी ३' सोबत केली जात आहे. बागी ३ ने दुसऱ्या दिवशी १६.०३ कोटी रुपये कमावले होते, तर बागी ४ ची कमाई त्याच्या जवळपास निम्मी आहे. चाहत्यांमध्ये उत्साह असूनही, चित्रपटाने पहिल्या दिवशी फ्रँचायझीमधील दुसऱ्या सर्वात कमी कमाईचा विक्रम केला आहे.

पुढील कमाईचा अंदाज

आज, तिसऱ्या दिवशी (रविवार) चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी चित्रपट ३० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.

'बागी 4' हा चित्रपट पाहावा की नाही?

'बागी 4' हा पूर्णपणे मारामारी आणि अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. ज्यांना केवळ अ‍ॅक्शन आवडते, त्यांनीच हा चित्रपट पाहावा. चित्रपटातील हिंसेमुळे कुटुंबासोबत हा चित्रपट पाहणे टाळलेलेच बरे. टायगरचा नवीन अवतार आणि सस्पेन्स जरी असला तरी, हा चित्रपट अ‍ॅक्शनप्रेमींसाठी एक 'ट्रीट' आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+