Athiya Happy Birthy : केएल राहुलने दिल्या खास शुभेच्छा; वाचा- KL राहुल अन् आथियाची लव्हस्टोरी
Athiya Shetty Happy Birthday : चित्रपटसृष्टीत असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यातील काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी. आजही अनेकजण इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत. अशीच एक स्टारकिड म्हणजे अथिया शेट्टी. आज तिचा वाढदिवस आहे. ती आज 32 वर्षांची झाली आहे.
सुनील शेट्टी यांनी आपल्या लाडक्या मुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी इन्स्टावर आपल्या मुलीच्या नावाने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांचे बालपणीचे काही फोटो आणि एक भावनिक संवाद लिहिले. तर दुसरीकडे अथिया शेट्टीचा पती भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलने देखील तीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. इंस्टावर फोटो शेअर करत त्याने अथियाला बर्थ-डे च्या शुभेच्छा दिल्या. आथियाच्या वाढदिवसानिमित्त तिची अन् केएल राहुलची प्रेमकहाणी कशी सुरू झाली, याची माहिती जाणून घेऊया...!

क्रिकेट आणि बॉलिवूड या समीकरणाचा विचार केला तर हे समीकरण खूप जुने आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. शर्मिला टागोर-मंसूर अली खान, विराट-अनुष्का, युझवेंद्र-धनश्री, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझहर यांच्यानंतर आणखी एक क्रिकेट आणि बॉलीवूडची जोडी चर्चेली जाते. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल या दोघांची. या दोघांनी ही त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर केली. तर त्यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्नही झाले.
विशेष बाब म्हणजे अथिया आणि केएल राहुल यांच्या लव्हस्टोरीत अण्णा सुनिल शेट्टीनेही खूप महत्त्वाची भुमिका बजावली आहे. चला तर मग जाणून घेऊया दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली.
पहिली भेट कधी झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटर केएल राहुल आणि अथियाची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. मात्र त्यांच्या पहिल्या भेटीबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही. अथिया आणि राहुलच्या फोटोंना पाहून त्याचा चाहतांना खूप आनंद होतो हे मात्र तितकेच सत्य आहे.
अथियाने राहुलला दिला आनंदाचा धक्का
2021 मध्ये, जेव्हा केएल राहुल इंग्लंड कसोटी मालिका खेळण्यासाठी निघाला तेव्हा अथिया देखील त्याच्यासोबत गेली होती. तिथे गेल्यानंतर अथियाने राहुलला आनंदाचा धक्काच दिला होता. त्यावेळी या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याला चाहत्यांनी देखील पसंदी दिली होती.
अण्णा सुनील शेट्टींनी केली मदत
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना सुरुवातीला त्यांचे नाते मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवायचे होते. यात अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही मदत केली. सुनील शेट्टीने लव्हबर्ड्सना त्यांचे नाते लाइमलाइटपासून दूर ठेवण्यास मदत केली. जेव्हा जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि राहुलबद्दल प्रश्न विचारला जायचा तेव्हा हे सगळं खोटं आहे, केवळ मीडियामध्ये चर्चा आहे, असे सांगून विषयाला बगल द्यायचे.












Click it and Unblock the Notifications