मलायकाला डेट केल्याबद्दल अर्जुन कपूरला होतोय पश्चाताप ? पोस्ट होत आहे व्हायरल
मुंबई : अर्जुन कपूर क्रिप्टिक पोस्ट: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चाहत्यांच्या सर्वात आवडत्या कपल्सपैकी एक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे कपल वेगळे झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकताच अर्जुन कपूरने वाढदिवस साजरा केला पण मलायका अरोरा पार्टीत सहभागी झाली नव्हती.

26 जून रोजी अर्जुन कपूरने लेट नाईट बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र अर्जूनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा गायब होती. या कपलचे नाते तुटल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान, आता अर्जुन कपूरने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट करताना अर्जुन कपूरने लिहिले की, "अनुशासनाची वेदना पश्चातापाच्या वेदनापेक्षा चांगली असते." अर्जूनने ही पोस्ट शेअर करताच काही मिनिटांतच ती व्हायरल झाली. एवढेच नाही तर आता अर्जूनच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा मलायकासोबतच्या त्याच्या ब्रेकअपच्या अफवा उडू लागल्या आहेत.
बॉलीवूडमधील हे कपल गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुन वेगळे झाले आहेत. दोघांनाही ही बाब सध्यातरी सार्वजनिक करायची नाही. तर मलायकाच्या मॅनेजरनेही ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झालेले नाही, ही केवळ अफवा असल्याचे म्हटलं आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले नाते सार्वजनिक केले होते. त्यानंतर दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले. पण गेल्या काही काळापासून हे कपल एकत्र दिसत नसल्याने त्यांनी फोटो शेअर करणेही बंद करून कमी केले आहे. त्यानंतर काही महिन्यांपासून ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.












Click it and Unblock the Notifications